निगमाचें वन । नका शाेधं करूं सीण ।।1।।

17 Jul 2023 18:47:49
 
 
 

saint 
सूर्य, चंद्र, सागर, पृथ्वी आदिचा खाेलवर परीचय करून घेण्यात यशस्वी हाेत असलेला माणूस स्वत:चा परीचय करून घेण्यात कमी पडला आहे. त्याचे हे कमी पडणे त्याच्याच माथी मारण्यास हरकत नसावी. कारण दुसऱ्याने आपला परीचय करून देण्यापेक्षा आपणच आपला परीचय करून घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी व आद्यकर्तव्य असते. ज्याला स्वत:चाच खरा परीचय झाला नाही, त्याला ईश्वराचा परीचय हाेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माणूस दु:ख, दारिद्रय घालवण्यासाठी, मनाच्या समाधानासाठी किंवा निस्वार्थ भाव म्हणून ईश्वराचा शाेध घेत असला तरीही माणूस त्याचा शाेध प्रामुख्याने मूर्तीत, =मंदिरात, पुराणात, शास्त्रात घेत असताे.
 
हा शाेध खऱ्या अर्थाने अत्यंत मर्यादित आहे. कारण ईश्वर हा आपल्याच अंत:रंगात आहे. ज्याला ईश्वराचा शाेध त्याच्या अंत:रंगात लागला, त्याला ईश्वर जीवमात्रात दिसताे. तसेच कणाकणात ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव हाेऊ शकते. म्हणून माणसाने ईश्वराला प्रथम स्वत:त शाेधावे. शास्त्र, पुराण, मंदिर, मूर्तीत त्याला शाेधण्यात वेळ घालवू नये. या अनुषंगाने बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, निगमांचे वन । नका शाेधू करूं सीण ।। जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
 
Powered By Sangraha 9.0