गीतेच्या गाभाऱ्यात

17 Jul 2023 19:26:23
 
 
पत्र चाेविसावे
 

Bhagvatgita 
 
पैसा नसल्यामुळे लग्नानंतर पहिल्या तीन वर्षांत माझी हाैस न भागल्यामुळे मला जाे मनस्ताप झाला ताे आठवला की मला अजून दु:ख हाेते. पुरुषाला काय वाटते ते तुम्हाला माहीत, पण मला त्या आठवणीने अजून दु:ख हाेते.हे असं कसं झालं?...त्याचं असं झालं. बी.ए.च्या परीक्षेत मला पहिला वर्ग मिळाला. पुण्याच्या काॅलेजमध्ये मला फेलाेशिप मिळाली.तसं पाहिलं तर एम्.ए. हाेऊन मी प्राेफेसरच व्हायचा; पण बी.ए.च्या निकालानंतर मला स्वप्नात आदेश आला कीतू एल्.एल्.बी.कडे जा.केव्हा केव्हा स्वप्नातले आदेश इतके बलवत्तर असतात की ते पाळलेच पाहिजेत, असे आपणाला वाटते.त्यावेळी तात्या वृद्ध झाले हाेते. सांगलीला - एका संस्थानात-ते वकिली करत हाेते. त्यांची वकिली जेमतेम पाेटापुरती चालत हाेती. त्यांच्याजवळ काहीही पैसा शिल्लक नव्हता.
 
स्वप्नातला आदेश ऐकून ते मला म्हणाले - कदाचित तुला लवकर पैसा मिळणार नाही. पण, कृष्णाची इच्छा दिसते. तू एल्.एल्.बी.कडे जा.असा प्रकार झाला म्हणून प्राेफेसर हाेण्याच्या ऐवजी मी वकील झालाे.तुमच्याकडच्या लाेकांनी विचार केला. सांगलीला मालकीचे घर आहे. वडील वकील आहेत. मुलाची उत्कृष्ट करिअर आहे. मुलीला लग्नानंतर भरपूर सुख लागेल.आपले लग्न झाले.असं पाहा. जीवन असे आहे, की प्रत्यक्ष रामालादेखील उद्या काय हाेणार ते कळले नव्हते. दुसरे दिवशी रामाला राज्यभिषेक हाेणेचा हाेता. राम -जानकी आनंदात हाेते. पण, प्रकार निराळाच झाला.न जाणू जानकीनाथे सवारे सूं थवानू छे हेच खरे.वकिलीमध्ये बस्तान बसायला कमीत कमी तीन वर्षे लागतात. मी वकील झालाे, पण, माझी वकिली पाेटापुरतीसुद्धा चालत नव्हती. तात्या वृद्ध झाले हाेते. ते काेर्टात येत, पण फारच कमी पक्षकार त्यांच्याकडे येत.
 
साहजिकच आमचे हाल हाेऊ लागले. सारी साेंगे वठविता येतात; पण पैशाचे साेंग वठवता येत नाही. पैसा नसल्यामुळे बाजार कसा करणेचा त्याची विवंचना सुरू झाली.अगं, तुझी हाैस पुरवणे तर दूरच; पण घरच्या लाेकांना साधी आमटी भाकरी कशी मिळेल त्याची चिंता सुरू झाली. तसं पाहिलं तर तात्यांच्या जवळ पैसा नसला तरी अफाट कृष्णभ्नती हाेती.तू एक वा्नय हृदयात काेरून ठेव.परमार्थाची शक्ती म्हणजे भक्ती, म्हणजे देवाची मूर्ती आणि भक्ती म्हणजेच श्रीमंती.तात्यांनी मला वारसा हक्काने पैसा दिला नसला, तरी भक्तीची श्रीमंती इतकी दिली आहे की, घेता किती घेशील दाे कराने। असा प्रकार झाला आहे. ही संपत्ती इतकी माेठी आहे की, कुबेराची संपत्ती त्यापुढे झक मारते.माझी आई आजारी हाेती. तिची सेवा करण्यामध्ये मला ब्रह्मानंद मिळत हाेता. मी मॅट्रिकमध्ये असताना आई आजारी पडली.
Powered By Sangraha 9.0