गीतेच्या गाभाऱ्यात

15 Jul 2023 15:20:54
 
 
पत्र चाेविसावे
 
 

Bhagvatgita 
 
लाेकांनी मला आपणहून जरी काही दिले तरी ते मी कसे घ्यावे? मी लाच घेऊ का? परमार्थांच्या प्रांतात तुझा नवरा लाचखाऊ आहे असे कृष्णाला वाटले तर तुला काय वाटेल? अगं कृष्ण मला खूप पगार देत आहे. त्याने सांगितलेले काम मी माेठ्या प्रेमाने करणेस नकाे का? त्या कामाबद्दल मी लाेकांकडून पैसे घेऊ का? असे करणे म्हणजे माझा अध:पात नाही का? असे पाहा, माझी एवढीच इच्छा आहे की मी असं वागावं की जेणेकरून माझा राजा माझा कृष्ण माझ्यावर खुश हाेईल. तू नीट विचार कर. माझी ही इच्छा वाईट आहे का?
 
*** तू जाे पुढचा प्रश्न विचारला आहेस त्या बाबतीत तुला दाेन गाेष्टी सांगताे, म्हणजे तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळेल.विनाेबांची आई म्हणजे श्रद्धा व भ्नती ह्यांची मूर्ती हाेती. त्यांचे वडील स्वत:ला बुद्धिवादी म्हणणारे हाेते.एका वर्षी चातुर्मासात विनाेबांची आई रु्निमणी हिने महादेवाला एक लक्ष तांदूळ वाहण्याचा संकल्प केला.दर साेमवारी रु्निमणी तांदूळ माेजायच्या व महादेवाला वाहायच्या. विनाेबांच्या वडिलांनी आपल्या पत्नीला सांगितलेतू असे कर. तू शंभर किंवा दाेनशे दाणे माेजून त्यांचे नीट वजन कर, मग इत्नया दाण्यांचे जर इतके वजन तर लक्ष दाण्यांचे वजन किती हे साधे त्रैराशिक मांडून तितके तांदूळ घे. तांदूळ कमी झाले म्हणून, तुझ्या देवाचा राेष हाेऊ नये म्हणून त्यामध्ये आणखी थाेडे घाल. असे झाले म्हणजे दर साेमवारी तांदूळ माेजण्याचा तुझा त्रास वाचेल व तू एकदम एक लक्ष तांदूळ देवावर वाहू शकशील.श्रद्धा व भ्नती ह्यांनी अंत:करण भरून गेलेल्या रु्निमणीबाईंना पतिराजांची यु्नती ऐकून काय उत्तर द्यावे ते समजेना. विनाेबा त्यावेळी लहान हाेते. त्यांनी विनाेबांना विचारले.
 
विनाेबा म्हणाले- ‘‘आई! पूजेच्या क्रियेत दाण्याच्या संख्येस महत्त्व नाही. त्या क्रियेमागची भावना-भ्नती किती ह्याला महत्त्व आहे. देवाला वाहण्याकरता आपण एकेक दाणे माेजत बसलाे म्हणजे आपली भ्नती वाढत असते. भ्नतीमुळे आपले चारित्र्य तयार हाेते. आपली भ्नती वाढली म्हणजे संकटाच्या वेळीदेखील आपणाला धीर येताे.’’ लहानग्या विनाेबाचे म्हणणे रु्निमणीबाईना पटले.त्यांनी पतिराजांचा सल्ला न मानता दाणे माेजण्याचे काम चालू ठेवले व चातुर्मासातील आपला नेम पुरा केला.दुसरी गाेष्ट अशी आहे- यावेळी विनाेबा वयाने माेठे हाेते. अध्यात्मात त्यांची खूप प्रगती झाली हाेती. निरनिराळे लाेक त्यांना निरनिराळे प्रश्न विचारीत.एकदा एका गृहस्थाने त्यांना विचारले.‘समाेरचा दिवा आहे हे जसे निश्चित आहे. तसे देव आहे हे तुम्ही निश्चित मानता का?’’ विनाेबांनी संथपणे शांतपणे उत्तर दिले- ‘‘देव आहे हे मी निश्चित मानताे. समाेरचा दिवा आहेच हे मी निश्चित सांगू शकत नाही.’’ या दाेन गाेष्टी माेठ्या मार्मिक आहेत.तुला वाटते की पतिपत्नीमध्ये मतभेद असू नये, त्यांनी कधीही वाद करू नये.
Powered By Sangraha 9.0