विचारीं तूं अर्जुनु। कीं कारुण्यें किजसी दीनु। सांग पां अंधकारें भानु। ग्रासिला आथी।। (2.13)

13 Jul 2023 12:15:58
 
 

Dyaneshwari 
 
श्रीकृष्णांचे मन वळावे म्हणून अर्जुनाने नानां प्रकारे समजाविले.आप्तांचा वध करावा का? त्यांच्या रक्ताने माखलेल्या सिंहासनावर बसून आपण उपभाेग घ्यावा का? वृद्ध नातलगांच्या वधामुळे हाेणाऱ्या पापाचे धनी काेण हाेणार? या पापामुळे आधीच प्राप्त झालेला श्रीकृष्ण तर दुरावणार नाही ना? अशा विविध शंका अर्जुनाने निर्माण केल्या.आणि युद्धभूमीवर शाेकाकुल हाेऊन ताे रडू लागला.स्वजनांच्या प्रेमाने त्याच्या चित्ताला पाझर ुटला. या त्याच्या मनाच्या अवस्थेचे वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, मिठावर जसा पाण्याचा प्रवाह यावा, वायूने जसे ढग हलावेत, त्याप्रमाणे अढळ असे अर्जुनाचे चित्त विरघळले. ताे सुकून गेला. चिखलात सापडलेला राजहंस जसा दीन हाेताे तसा ताे म्लानवदन झाला. अशा या अर्जुनाला पाहून श्रीकृष्ण म्हणाले, ‘अर्जुना, युद्धभूमीवर हे तुझे विचार याेग्य आहेत का? तू काेण आहेस काय करीत आहेस?
 
तुला झाले तरी काय आहे? तुला एवढा खेद का झाला? खरे पाहता अयाेग्य गाेष्टीकडे तू कधी लक्ष देत नाहीस. तुझे धैर्य कधी नाहीसे हाेत नाही. तू शाैर्याचे वसतिस्थान आहेस. तू सर्व क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आहेस. तीनही लाेकांत तुझ्या शाैर्याचा डंका गाजत आहे. शंकरांना, निवातकवचांना, गंधर्वांनादेखील पराक्रम करून तू जिंकलेस. असे तुझे शाैर्य आहे. आणि ताेच तू आज युद्धात शाैर्य गाजवण्याचे साेडून, मान खाली घालून रडत बसला आहेस.’ ओवीच्या प्रारंभीचा शब्द विचारीं असा आहे. ज्ञानेश्वरांच्या या शब्दाचा अर्थ ‘विचार करा’ असा घ्यावा लागताे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ‘अर्जुना, तू नीट विचार कर. तुझ्यासारख्या शूराला दयेने ग्रासावे का? अंधकाराने सूर्याला झाकावे का? अमृताला कधी मृत्यू प्राप्त हाेईल का?’
Powered By Sangraha 9.0