गीतेच्या गाभाऱ्यात

13 Jul 2023 12:38:12
 
 
पत्र तेविसावे
 
Bhagvatgita
चवथा शब्द व म्हणजे वरती वरती नामदेवांचे बहारीचे अभंग म्हणजे समाधीचे अभंग.यामध्ये करुण रसाची परमावधी झाली आहे. ह्यावेळी अवघी पंढरी आळंदीस गाेळा झाली हाेती. ज्ञानेश्वर समाधिस्थ झाले, आणि निवृत्तिनाथांनी शिळा बसविली, त्यावेळी जाे अश्रूंचा पूर वाहिला त्याबद्दलचे नामदेवाचे अभंग वाचून ज्याच्या डाेळ्यांत अश्रू येत नाहीत ताे माणूसच नव्हे. इतके परिणामकारक चित्र मराठी वाङ्मयात दुसऱ्या काेणी काढले नाही.ज्ञानेश्वरांचे समाधीनंतर नामदेव 54 वर्षे जगले, नामदेव उत्तर हिंदुस्थानांत गेले. ते ‘‘वरती वरती’’ गेले व भागवत धर्माचा प्रसार त्यांनी केला. नामदेवांनी जी भक्तिमार्गाची परंपरा निर्माण केली त्या परंपरेतून रामानंद, कबीर, नानक असे संत निर्माण झाले.
 
शिखांच्या ग्रंथसाहेबात नामदेवांची 61 पदे समाविष्ट असून, ती ‘‘भ्नत नामदेवजीकी मुखवाणी’’ म्हणून प्रसिद्ध आहेत.तुला मी एक गम्मत सांगताे की, टॅ्नसीतून जाताना मला मुंबईस पुष्कळ वेळा शीख ड्रायव्हर भेटताे.नामदेवांचे नाव घेतले की, त्या ड्रायव्हरला कमालीचा आपलेपणा वाटताे व त्याचे नि आपले घरगुती नाते निर्माण हाेते.नामदेवांचे नाव घेतल्याबराेबर पंढरी ते पंजाब ही अक्षरे माझ्या डाेळ्यापुढे नाचू लागतात व नामदेवांनी ‘‘वरती वरती’’ जाऊन जे अलाैकिक कार्य केले ते पाहून मी नतमस्तक हाेताे.पेशव्यांनी महाराष्ट्राचा भगवा झेंडा ‘‘वरती वरती’’ नेऊन फडकावला हे खरे आहे; पण सत्तेचा आधार नसताना पेशव्यांच्या पूर्वी पुष्कळ वर्षे आधी नामदेवांनी महाराष्ट्राचा भ्नतीचा झेंडा ‘‘वरती वरती’’ घेऊन फडकावला हे महान आश्चर्य आहे.
 
एका वा्नयात तुला मी सांगताे की - पंढरीचा विठाेबा विटेवर उभा आहे आणि पंढरी ते पंजाब भ्नतीचा झेंडा फडकावणाऱ्या नामदेवांचे नाव महाराष्ट्राच्या मनाच्या विटेवर युगे अठ्ठावीस उभे राहील.त्यांत तिळातांदळाइतकाही संदेह नाही.असाे. नामदेवांच्याबद्दल तुला चार शब्द पाहिजे हाेते.गीतेच्या गाभाऱ्यांत उभे राहून त्या चार शब्दांबद्दल मनन कर व आपले जीवन उच्च, उदात्त, उत्तुंग करण्याचा प्रयत्न कर.परमार्थमार्गात तुझी खरी प्रगती व्हावी, त्याबद्दल सदैव देवाची कृपा मागणारा -
 
तुझा राम * * *
 
पत्र चाेविसावे प्रिय जानकी, तुझे पत्र पावले. त्या पत्रात आरंभीच तुला किंचित राग आलेला दिसताे. शृंगारशास्त्रात म्हटले आहे, की पत्नी रागावली म्हणजे ती अधिक सुंदर दिसते.ज्ञानेश्वरीत ‘शृंगाराच्या माथा पाय ठेवी’ असे म्हटले आहे. नवरसांचा राजा शृंगार असला तरी गीता व ज्ञानेश्वरी वाचून तुला कळून येईल की ‘शृंगाराच्या माथा पाय ठेवी’ शृंगाराच्या डाे्नयावर पाय ठेवणारा शृंगारापेक्षा देखील सरस असा एक रस आहे.
Powered By Sangraha 9.0