शास्त्रवचन, थाेरवचन आणि आत्मप्रचिती

12 Jul 2023 18:36:34
 
 

Gondavlekar 
 
ज्या देवाची पूजा करायची ती त्याला ज्याची आवड असेल तशी करावी लागते. रामाला फक्त नाम आवडते, तेव्हा त्याच्या नामात राहिल्याने ताे आपलासा हाेईल.आपण आपल्या सर्व व्यवहारात, ‘परमेश्वर कर्ता’ ही बुद्धी ठेवावी. प्रत्येक व्यवहारात त्याला हाका मारल्यावर आपल्याजवळ येणेच त्याला भाग पडते.आमच्याकडे ‘रान उठवून’ मग शिकारी शिकार साधताे.रानात शिकारी गेल्यावर हाकारी चहूबाजूंनी हाका घालतात; मग अनायासे सावज शिकाऱ्याच्या पुढ्यात येते.त्याप्रमाणे आपण सर्व बाजूंनी भगवंताला हाका मारल्यावर ताे खात्रीने आपल्याजवळ येईल.एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारले की, तू तुझ्या मुखानेच आम्हांला सांग की आम्हांला तुझी प्राप्ती कशी हाेईल. तेव्हा परमात्मा म्हणाला, ‘भ्नती केल्यानेच माझी प्राप्ती हाेऊ शकते.’ भ्नतीची तीन साधने आहेत :- शास्त्रवचन, थाेरवचन आणि आत्मप्रचिती. आपले सध्या सगळेच विपरीत झाले आहे.
 
शास्त्रवचन म्हणावे, तर आपण आता इतके सुधारक झालाे आहाेत की हल्लीच्या ज्ञानाचे आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते. थाेरवचन म्हणावे, तर मुलगा माेठा हाेऊन बापापेक्षा जरा जास्त शिकला की त्याला वाटते, मी या गावंढळ बापाचे कसे ऐकू, त्यापासून माझा काय ायदा हाेणार? तसेच आत्मसंशाेधनाचे.आपण शाेधन करताे ते कसले, तर पांडव कुठे राहात हाेते? रामाचा जन्म काेणत्या गावी झाला? काैरव-पांडवांचे युद्ध काेणत्या ठिकाणी झाले? मला सांगा, अशा संशाेधनापासून आपला कसा ायदा हाेणार? आपण जर आपले वर्तन पाहिले, मनातले विचार बघितले, तर आपल्याला असे आढळून येईल की, लाेकांना जर ते कळले तर लाेक आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत;
 
आणि असे असूनही आपण आपल्या संशाेधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगताे, याला काय म्हणावे? अशाने का आपल्याला भगवंताचे प्रेम लाभणार? आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसऱ्या कुणी सांगण्याची गरजच नाही, आपल्याला ताे पुरता ठाऊक असताे. अभिमान खाेल गेलेला, विचारांवर ताबा नाही, साधनात आळशीपणा; मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचे प्रेम कसे लाभणार? साधुसंतांनी यावर एकच उपाय सांगितला आहे आणि ताे म्हणजे पूर्ण शरणागती.रामाला अगदी विनवणी करून सांगा की, ‘रामा, आता मी तुझा झालाे; यापुढे जे काही हाेईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा मी आटाेकाट प्रयत्न करीन; तू मला आपला म्हण.’ देव खराेखरच किती दयाळू आहे!
Powered By Sangraha 9.0