तू का म्हणे तूंच ऐसा एक साचा । ऐसी तंव वाचा जाली नाही ।।1।।

01 Jul 2023 15:12:19
 
 

saint 
 
असे अनेक लाेक, अनेक घटना, कार्य, वस्तू अशा असतात की त्याची तुलना इतर कशाशीही हाेऊ शकत नाही. अशा अतुलनिय घटना, गाेष्टी, कार्य, वस्तूशी अनेक स्वार्थी लाेक तुलना करून समाेरच्याला खुश करण्याचा प्रयत्न करीत असतात. एखाद्या प्रियशीला, प्रियकराला जाळ्यात ओढण्यासाठी तू चंद्रासारखी शितल आहेस, तू सूर्यासारखा प्रकाशमान आहेस, तारे तुझ्यापुढे फिके पडतात, वगैरे अतुलनीय शब्द वापरतात.सूर्य, चंद्र, सागर हे सर्व अतुलनीय आहेत. तरी पण माणूस स्वार्थासाठी एखाद्याला या अतुलनीय वास्तवतेच्याही पलीकडे नेताे. ज्याला कसल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, पण समाेरच्यावर खूप प्रेम आहे.
 
समाेरच्याची ेवढी पात्रताही आहे, तेव्हा त्याच्या स्तुतीला खराेखर शब्द, वस्तू, घटना, कार्य, व्यक्ति आदि अपुरे पडतात. आपणाला स्वपरीचय करून देणारा भगवंत असाच आहे, की ज्याला अतुलनियच म्हटले पाहिजे. ज्याची काेणाशी तुलना हाेऊच शकत नाही. तू फलाण्यासारखा आहेस, असे म्हणण्याचे धाडस आपली जिव्हा करूच शकत नाही. कारण आपला सद्गुरु, आपला परमात्मा हा केवळ त्याच्या सारखाच आहे. हे सांगतांना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तूंच ऐसा एक साचा । ऐसी तंव वाचा जाली नाही ।। जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0