मज हृदयीं सद्गुरु। जेणें तारिलाें हा संसारपूरु। म्हणऊनि विशेषें अत्यादरु। विवेकावरी।।(1.22)

01 Jul 2023 15:14:28
 
 
 

Dyaneshwari 
श्रीगणेश, श्रीशारदा यांना वंदन केल्यानंतर ज्ञानेश्वमहाराज अत्यंत नम्रतेने आपले सद्गुरूस वरील ओवीत वंदन करीत आहेत. ज्ञानेश्वरांचे सद्गुरु काेण? त्यांचे थाेरले बंधू श्रीनिवृत्तीनाथ हेच त्यांचे थाेर सद्गुरुनाथ हाेत. ज्ञानेश्वमहाराजांनी वारकरी पंथाचा पाया घातला असला तरी त्यांचे मूळ गुरुस्थान व त्यांची पुढील परंपरा ही नाथपंथीयही आहे, नाथपंथ हा सर्व पंथांच्या आधीचा पंथ आहे. आदिनाथ, पार्वती, मत्स्येद्रनाक्ष, गाेरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तिनाथ अशी ही थाेर परंपरा सर्व महाराष्ट्रास ललामभूत झाली आहे.नाशिक जवळच्या सप्तशृंगीच्या डाेंगरातील जंगलात ही भावंडे िफरत असताना वाट चुकली. अशा प्रसंगी निवृत्तिनाथांना गहिनीनाथांनी दर्शन दिले व त्यांच्या मस्तकावर हस्त ठेवून अनुग्रहही दिला.
 
आपेगाव येथील ज्ञानेश्वरांचे आजे व पणजे यांनाही नाथसांप्रदायाची दीक्षा हाेती. आपले थाेरले बंधू व सद्गुरुनाथ निवृत्तीनाथ यांचे स्तवन ज्ञानेश्वरांनी सर्व ग्रंथात अनेक प्रकारांनी केले आहे. हे सद्गुरु त्यांच्या हृदयात नित्य असतात. या सद्गुरुंच्या कृपेमुळेच ज्ञानेश्वरांची निष्ठा सद्विचारांवर जडलेली आहे. ज्ञानेश्वर संसारसागरातून उत्तीर्ण हाेऊन गेले आहेत. येथून पुढल्या काही ओव्यांतून ज्ञानेश्वर आपल्या सद्गुरूंचेच वर्णन करीत आहेत. दृष्टांत देऊन ज्ञानेश्वर म्हणतात की, ज्याप्रमाणे पायाळू मनुष्याने डाेळ्यांत अंजन घातले असता त्याला भूमिगत द्व्य दिसू लागते किंवा हातात चिंतामणी आल्यावर मनुष्याचे सर्व मनाेरथ पूर्ण हाेतात, त्याप्रमाणे ज्ञानेश्वरही निवृत्तिनाथांच्या कृपेमुळे पूर्णकाम झाले आहेत.
 
Powered By Sangraha 9.0