2. कामांध : कामवासनेने बरबटलेल्या/ कामासक्त व्यक्तीचे मन त्याच अभिलाषेत लिप्त राहते. आजूबाजूच्या गाेष्टींचा, इतरांचा विचारही त्याच्या मनात येत नाही. म्हणजेच डाेळ्यांनी दिसूनही प्रत्यक्ष मात्र त्याला काहीही दिसत नाही.
3. मदाेन्मत्त : मदाने माजलेली, मद्यधुंद, नशेत गर्क असणाऱ्या उन्मत्त व्यक्तीला काहीच समजत नाही. ‘उन्माद’ हा एक प्रकारचा गंभीर मानसिक आजार आहे.अशा मन:स्थितीत व्यक्ती मारझाेड, रक्तपात, आत्महत्या इ. क्रूर कृत्ये सहज करते.