जे जें कांही करिताे देवा । तें तें सेवा समर्पे ।।1।।

08 Jun 2023 14:27:04
 
 
saint
 
इतरांनी आपणाला चांगले व माेठे म्हणावे असे जवळपास प्रत्येकालाच वाटत असते.खरे म्हणजे आपल्या हातून चांगले कार्य घडत असेल तर इतरांना आम्हाला चांगले म्हणा असे म्हणण्याची वेळ आपणावर येत नाही.आपले कार्य पाहून लाेक आपाेआप चांगले, माेठे म्हणू लागतात. आपल्या हातून चांगले कार्यच घडत नसेल तर इतरांनी चांगले व माेठे म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण अनेकांना कसलेही कार्य न करताही माेठे म्हणून घ्यायची सवय असते. इतरांनी केलेल्या कार्याचे श्रेय लाटणारेही कांही कमी नाहीत. पण समाजात असेही अनेक लाेक आहेत की जे माेठेपणासाठी कार्य करीत नाहीत तर
 
केवळ कर्तव्य म्हणून किंवा मनाच्या समाधानासाठी कार्य करतात. त्यांना त्या कार्याचे कसल्याही प्रकारचे श्रेय नकाे असते. अशा लाेकांना काेणी माेठे म्हटले तर आवडतही नाही. अशा लाेकात केवळ निस्वार्थी लाेकांचा, संत महात्म्यांचा समावेश हाेताे.जगद्गुरु असणारे तुकाेबाराय रात्रंदिन समाजासाठी कार्य करीत असूनही ते त्या कार्याला केवळ सेवा समजतात. या अनुषंगाने आपले मनाेगत सांगतांना ते म्हणतात, जें जें कांही करिताे देवा । तें तें सेवा समर्पे ।। या अभंगाची अनूभूती खूप आनंददायी असेल.
जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0