दिसून येऊ नये अशी त्याने व्यवस्था करून ठेवलेली असते.ताे वरून गुलामांची मान मुरगळत असताे, पण त्या बिचाऱ्याला हे ठाऊकही नसते की त्याची मान पण त्या गुलामांच्या हाती आहे. सगळ्याच गुलाम्या पारस्पारिक असतात. सगळी बंधनं पारस्पारिक असतात.कधी पाहिलं का रस्त्यातून जेव्हा एखादा पाेलीस एखाद्याला बेड्या घालून घेऊन जाताे तेव्हा? वरवर पाहिलं तर असं दिसतं की पाेलीस हा मालक आहे अन् दुसरा माणूस कैदी आहे. पण जर ताे पाेलीस त्या कैद्याला साेडून पळाला तर ताे कैदी त्या पाेलीसाचा पाठलाग करणार नाही. उलट जर ताे कैदी पळाला तर पाेलीस त्याचा पाठलाग करू लागताे, त्याचा जीव जायची वेळ येईल. कैद्याच्या हातांना बेड्या तर हाेत्याच पण त्याच्याबराेबर त्या पाेलीसाच्याही हाताला पडल्या हाेत्या. कैदी पळाला तर ते भलतंच महाग पडेल पाेलीसाला.
दाेघेही एकमेकांना बांधले गेलेत. एक खुर्चीवर आहे, दुसरा जमिनीवर. पण दाेघेही बांधले गेलेले आहेत.काेणत्याही वस्तूशी आपण संबंध निर्मित करताे, तेव्हा एक सेतू बनताे. अन् सेतू बनवण्यासाठी दाेन गाेष्टी लागतात. उदा.नदीवर आपण पूल बांधताे. एका किनाऱ्यावर पाया ठेवून पूल नाही हाेऊ शकणार. दुसऱ्या किनाऱ्यावरही ताे ठेवावाच लागेल. दाेन्ही किनाऱ्यावर पाया भरला तरच पूल हाेऊ शकेल.याचप्रमाणे आपण जेव्हा दखाद्या वस्तूशी वा व्य्नतीशी संबंध निर्मित करताे, तेव्हा एक सेतू निर्माण हाेताे. एक किनारा आपण असताे अन् दुसरा किनारा दुसरा असताे.हा संबंध जाेडणारा सेतू पाडण्यासाठी कृष्णाने एकान्ताचा प्रयाेग केला आहे.