विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पाेफळीच्या बागा आणि डाेंगरदऱ्यांनी नटलेल्या काेकणातील पर्यटनाला मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमुळे चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर मडगावमधून निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) आगमन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बाेलत हाेते.वंदे भारत एक्स्प्रेसचे लाेकाे पायलट व प्रवाशांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे मिठाई आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लाेढा, खासदार राहुल शेवाळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार यामिनी जाधव, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश लालवाणी, मुंबई विभागाचे महाप्रबंधक रजनीश गाेयल आदी उपस्थित हाेते.पंतप्रधानांनी राज्यासाठी पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली. गाेवा आणि काेकणातील पर्यटनाला यामुळे चालना मिळेल, असा विश्वास केसरकर व शेवाळे यांनी व्यक्त केला.