ओशाे - गीता-दर्शन

30 Jun 2023 13:53:10
 
 

Osho 
आणि साेबत आणखी एक धाेका बराेबर बाळगून राहाल.ताे धाेका हा की यानंतर ध्यानात जाण्याची हिंमत आपण पुन: कधीच करणार नाही. कदाचित कारण ते मृत्यूचं भय आणखीनच खाेलवर पाेहाेचलेलं असेल, एवढंच काय, पूर्वीपेक्षा आता ते खूपच स्पष्ट झालेलं असेल.जेव्हा ध्यानात मृत्यूची प्रतीती हाेते तेव्हा आपण अमृताच्या दरवाज्यात उभे असता.घाबरून भयभीत हाेऊन गेलात तर परत निघून जाल. जर प्रवेश केलात तर आपण अमृतात प्रवेश केलाच असं समजा. मग काेणताही मृत्यू नाहीये.मृत्यूत प्रवेश करताच अमृताचा अनुभव हाेताे. मिटून जाऊनच, जे आहे ते जाणावं लागतं.म्हणून कृष्ण जे सांगताे, भयरहित चित्तानेच प्रवेश श्नय आहे. ते याेग्यच आहे.
 
माझा इथला तर राेजचा अनुभव आहे. शेकडाे व्य्नती किती आतुरतेने ध्यानात प्रवेश करतात. जे जास्त श्रम करीत नाहीत त्यांना कुठलीही अडचण येत नाही. कारण मृत्यूचा अनुभव व्हावा त्या बिंदूपर्यंत ते पाेहाेचतच नाहीत. पण जे जास्त श्रम करतात ते अशा बिंदूपर्यंत अवश्य पाेहाेचतात.तिथं मृत्यू दिसताे - आता खलास झालाे - संपलाे आपण असं हाेतं.आता जर आपण यात आणखीन पुढे गेलाे, तर फुटून विखरून आपण खलास हाेणार, पुन: परतायला पण येणार नाही, अजिबात. हा अनुभव इतका प्रगाढ असताे की ताे आपला सारं प्राण व्यापून टाकताे.आपणाला कासावीस करताे आणि त्यामुळे आपण व्याकूळ हाेऊन जाताे. बाहेर पळून जाताे.हे राेज घडतं.
Powered By Sangraha 9.0