संतुलन नसलेल्या आहारामुळे पाेट खराब हाेते. आळसापाेटी दिवस खराब जाताे. मूर्ख पुत्रामुळे वंशाचा नाश हाेताे. कडवट बाेलण्याने संबंधांत बिघाड निर्माण हाेताे. लांगुलचालन केल्याने चारित्र्य खराब हाेते. गरजेपेक्षा जास्त धन कमावल्याने बुद्धी भ्रष्ट हाेते आणि आपल्या कर्तव्यांचे पालन न केल्यामुळे संपूर्ण जीवन खराब हाेते.कर्तव्य धर्म आहे आणि कर्तव्यच पूजा आहे. कर्तव्यापाेटीच भविष्य घडते. आपले कर्तव्य करत राहा.