बाेध : वेळ (काळ) कुणासाठी थांबत नाही. आला क्षण निघून जाताे. कालप्रवाह पुढे-पुढेच जाताे, अनंताकडे! कालचक्र अव्याहत िफरतच राहते; त्याची गती ना नियंत्रित करता येते, ना बदलता येते, ना थांबवता येते! म्हणूनच जीवनातील एक-एक क्षण अनमाेल आहे, त्याचा सदुपयाेग करावा.कारण काळ कुणालाही ‘वेळ’ वाढवून देत नाही.काळ सदैव जागृत असताे. त्याचे अस्तित्व सदैव जाणवते. ताे काल हाेता, आज आहे आणि उद्याही असेलच! म्हणूनच म्हणतात, ‘कालाय तस्मै नम:।’