गीतेच्या गाभाऱ्यात

29 Jun 2023 12:29:17
 
 
पत्र बाविसावे
 
Bhagvatgita
कृष्ण काल्पनिक नसून ऐतिहासिक पुरुष हाेता असे जे तुला वाटते ते अगदी बराेबर आहे.गीतेमध्ये कृष्णार्जुनसंवाद आहे व कृष्णानं गीतेत जे भाषण केले आहे ते सारेच ताे युद्धभूमीवर बाेलला, असे मानण्याचे कारण नाही.युद्धभूमीवर अर्जुनाला विषाद उत्पन्न झाला व ताे युद्ध करत नाही असे म्हणाला, तेव्हा कृष्णाने त्यास खरे तत्त्वज्ञान सांगितले व ते ऐकून अर्जुन युद्धासाठी सज्ज झाला.त्या प्रसंगाच्या आधाराने व्यासांनी विस्तार करून गीता ग्रंथ तयार केला.तू ज्ञानेश्वरी वाचली आहेस. गीतेमध्ये कृष्णाच्या ताेंडी जे भाषण आहे त्यापेक्षा कितीतरी पट माेठे भाषण ज्ञानेश्वरीमध्ये कृष्णाच्या ताेंडी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये कृष्णाच्या ताेंडी जे भाषण आहे ते सारे भाषण का कृष्णाने युद्धभूमीवर केले हाेते?
 
गीतेमध्ये तेराव्या अध्यायात श्लाेक 7 ते 11 मध्ये कृष्णाने ज्ञान म्हणजे काय ते सांगितले आहे. गीतेमध्ये तेराव्या अध्यायात ताे सातवा श्लाेक आहे त्यावर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी तीनशे अठ्ठावीस ओव्या केल्या आहेत. एकाच श्लाेकावर ज्ञानेश्वरांच्या तीनशे अठ्ठावीस ओव्या आहेत.ज्ञानेश्वरीमध्ये कृष्णाच्या ताेंडी जे भाषण आहे ते सारे भाषण कृष्णाने युद्धभूमीवर केले नव्हते. त्याबद्दल वाद असण्याचे कारण नाही.गीतेत जे कृष्ण बाेलला त्यांचा ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणाकरिता विस्तार केला आहे. त्यांचा वाग्विलास अपूर्व आहे. सारे जग गीतार्थाने भरून जावे, अशी त्यांची तळमळ आहे. कृष्णाच्या तत्त्वज्ञानाने जगामध्ये आनंदाचे साम्राज्य निर्माण करण्याकरिता त्यांच्या काव्यप्रतिभेने कृष्ण जे बाेलला त्याचा रम्य, भव्य, दिव्य विस्तार केला.
 
ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर म्हणताततैसा वाग्विलास विस्तारू। गीतार्थे विश्व भरू।। आनंदाचे आवारू। मांडू जगा।। तू असे लक्षात घे की कवी, नाटककार, इतिहासकार ऐतिहासिक व्य्नतीच्या ताेंडी काल्पनिक संवाद घालत असतात. शे्नसपीअरने तिसऱ्या रिचर्डच्या ताेंडी असे एक काल्पनिक वा्नय घातले आहे. रिचर्ड म्हणताे- ‘‘पूर्ण दिवस भरण्यापूर्वी मी जन्माला आल्यामुळे मी इतका विद्रूप व विचित्र दिसताे की, मी जवळ येताच माझ्याकडे पाहून कुत्रीदेखील भुंकू लागतात.’’ थाेर इतिहासकार युसिडायडिस हा अत्यंत सत्यनिष्ठ इतिहास लेखक म्हणून सर्वमान्य आहे. तरीदेखील विशिष्ट घटनांचे स्पष्टीकरण करण्याकरता ऐतिहासिक व्य्नतींच्या ताेंडी त्याने काल्पनिक संवाद व काल्पनिक भाषणे घातली आहेत. ताे म्हणताे- ‘‘वाचकांच्या मनावर त्या घटनांपासून घ्यावयाचा बाेध चांगला बिंबावा म्हणून मी हा मार्ग मुद्दामच स्वीकारला.’’ तू ही भूमिका लक्षात घे.महाभारताच्या आदिपर्वात म्हटले आहेइदं शतसहस्र हि श्लाेकांनां पुण्यकर्मणाम्। सत्यवत्यात्मजेनेह व्याख्यातमिताैजसा।।
Powered By Sangraha 9.0