ओशाे - गीता-दर्शन

28 Jun 2023 11:53:13
 

osho 
 
 
जिथं जिथं भय आहे, तिथं तिथं मृत्यूचा काही अंश दिसत असताे.एखाद्या वेळी प्रत्यक्ष दिसणार नाहीही; पण थाेडंसं खरवडलं की, मी भयभीत का आहे ते दिसून येईल. माझ्यात कुठे ना कुठे, काही तरी मरतं म्हणून मी भयभीत हाेताे. मग भले माझं धन सुटत असेल तरी-धनामुळे जी सुरक्षा आहे की उद्याही जेवण मिळेल, घर मिळेल, म्हणजे मी मरून जाणार नाही.धन हिरावलं गेलं तर उद्या धाेका हाेऊ शकताे. जेवण नाही मिळालं तर? प्रतिष्ठा आहे, धन जवळ नसलं तरी आशा करू शकताे की उद्या कुणी साथ देईल, काेणी सहकार्य करील; पण मी प्रतिष्ठेलाही मुकलाे तर? भय वाटतं की उद्या या विशाल जगात काेणी जाेडीला नसलं, तर काय हाेईल? जिथं म्हणून भय आहे तिथं थाेडंही शाेधलं अगदी फ्नत चामडी एवढंच खाेल, तरी तिथं मृत्यू उभा असल्याचं दिसून येईल. साेबत दुसरंही काही कारण असू शकतं.
 
मृत्यू उभा असल्याचं दिसून येईल. अन् बाकीची भयं त्याचीच छाेटीशी रूपे आहेत. डाेसेस आहेत. मृत्यू थाेड्या फार प्रमाणात तिथं देखील हजर आहे.अन् कृष्ण म्हणताे, जाे काेणी अभयाला उपलब्ध हाेताे, जाे काेणी भयरहित हाेताे, त्याचीच ध्यानात गती हाेते, तरच त्याचं पाऊल ध्यानात पडतं. इथं समाधीत अन् ध्यानात ‘भय’ आणायची काय जरूर? इथं मरणाचा काय संबंध? इथं मृत्यूचा प्रश्न आहे. महामृत्यूचा प्रश्न आहे. कारण साधारण मृत्यूमध्ये तर फ्नत शरीर मिटतं. आपण मिटत नसताे. फ्नत कपडे बदलतात. आपण त्यात नाही बदलून जात.आपण तेच राहता. आपण तर पुनः पुन्हा नवे शरीर धारण करता.
Powered By Sangraha 9.0