ओशाे - गीता-दर्शन

27 Jun 2023 14:47:10
 
 

osho 
 
तेच निरंतर स्मरण.कृष्ण म्हणताे ‘अशी निरंतर स्मरणाला प्राप्त व्य्नतीच माझ्यात प्रतिष्ठित हाेतेय किंवा उलट म्हटलं तरी चालेल.बराेबर अशा व्य्नतीमध्ये, शून्य, निराकार झालेल्या व्य्नतीमध्ये, अशा सतत स्मृतीने भरलेल्या व्य्नतीमध्ये, प्रभू प्रतिष्ठित हाेताे.’ प्रश्न - भगवानश्री, या दाेन श्लाेकात ध्यानाच्या साधकांसाठी काही गाेष्टी सांगितल्या आहेत. त्यातल्या एका छाेट्या व विशेष गाेष्टींवर प्रकाश टाकणे जरूर आहे. म्हटलं आहे- विशेष आसन, पवित्र शुद्धभूमी, पाठीचा सरळ कणा, नासिकाग्र दृष्टी, ब्रह्मचर्यव्रत आणि भयरहित शांत अंतःकरणाचा साधक. भयरहित हाेण्याचा ध्यानसाधनेत काय अर्थ आहे? कृपया स्पष्ट करावे.उत्तर - भयरहित, उत्तमप्रकारे शांतचित्ताचा हे महत्त्वपूर्ण आहे.
 
खूपच महत्त्वाचं आहे. कारण ज्याला भय आहे त्याला परमात्म्यात प्रवेश करता येणार नाही. का? तर भय म्हणजे काय ते थाेडं नीट समजून घ्यावं लागेल. भय काय आहे? मुळात भयाचा आधार काय? लाेक भयभीत का आहेत? ज्यामुळे सारं भय निर्माण हाेतं ते मूळ कारण काेणतं? आजारी पडण्याचं भय आहे. दिवाळं निघण्याचं भय आहे. अश्रू धुळीला मिळण्याचं भय आहे. हजार हजार भयं आहेत.पण खाेलात भय एकच आहे. ते आहे मृत्यूचं भय. आजारपण भयभीत करतं, कारण आजारपणात मृत्यूचं आंशिक दर्शन सुरू हाेतं.गरिबी भयभीत करते. कारण गरिबीत मृत्यूचं आंशिक दर्शन सुरू हाेतं. अप्रतिष्ठाही भयभीत करते. कारण अप्रतिष्ठेतही मृत्यूचा थाेडासा अंश दिसू लागताे.
Powered By Sangraha 9.0