आतां विश्वात्मकें देवें। येणें वाग्यज्ञें ताेषावें। ताेषाेनि मज द्यावें। पसायदान हें।। (18.1793)

27 Jun 2023 14:52:17
 
 

Dyaneshwari 
 
संत श्राेत्यांची महती गाइल्यानंतर ज्ञानेश्वर विश्वरूप देवापाशी म्हणजे निवृत्तीनाथांपाशी अखेरचे पसायदान मागत आहेत. ज्ञानेश्वरांचे हे पसायदान वारकरी पंथामध्ये अत्यंत लाेकप्रिय व आदरणीय आहे. ज्ञानेश्वरांनी ईश्वराला व सद्गुरूनाथांना काय मागितले? आपण देवाला काय मागताे? या प्रश्नाचा विचार करून या पसायदानाकडे पहावे. ज्या समाजाने ज्ञानेश्वरांचा आधीच्या काळी अधिक्षेप केला त्या समाजाचे कल्याण व्हावे म्हणून ज्ञानेश्वर पसायदान मागत आहेत.ते असे म्हणतात की, या विश्वरूपी देवाने आता माझ्या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला प्रसाददान द्यावे. ज्ञानेश्वरांना काेणता प्रसाद हवा? श्रीकृष्णाने दुर्जनांचा नाश केला. असेच त्याचे तत्त्वज्ञान आहे. पण ज्ञानेश्वर आणखी एक पाऊल पुढे टाकीत आहेत.
 
ते असे म्हणतात की, दुष्टांचा कुटिलपणा नाहीसा व्हावा. त्यांना सत्कर्मांत आवड निर्माण व्हावी. प्राण्यांची एकमेकांत मैत्री व्हावी. पापाचा अंधार दूर व्हावा. सर्व जगात स्वधर्माचा उदय व्हावा जाे प्राणी जे इच्छील ते त्याला प्राप्त व्हावे. सर्व पृथ्वीवर ईश्वरनिष्ठांचा समुदाय निर्माण व्हावा. चालणाऱ्या कल्पतरूंचे बगीचे तयार व्हावेत. चिंतामणी सजीव व्हावेत.अमृताचे सागर बाेलणारे व्हावेत. चंद्र कलंकरहित व्हावा. सूर्य उष्णतारहित व्हावा.सज्जनांची आवड सर्वांना वाटावी.ार काय सांगावे? तीनही लाेक सर्व सुखांनी पूर्ण हाेऊन त्यांचे चित्त आदिपुरुषाच्या ठिकाणी अखंड असावे.ज्ञानेश्वरांचे हे पसायदान अलाैकिक तर खरेच. जगाच्या वाययात याला ताेड सापडणार नाही. मानवी मनाची उंची केवढी असू शकते, हे या पसायदानावरून ध्यानात येते.
Powered By Sangraha 9.0