ओशाे - गीता-दर्शन

22 Jun 2023 16:30:32
 
 

Osho 
काेणी साधक, काेणी संन्यासी, काेणी याेगी येऊन त्या झेन फकिराजवळ ध्यानासाठी विषय मागत. ताे पाहत राहताे. ताे मुलगा एवढं लक्षात घेताे की काेणी साधक येताे ताे मंदिराची घंटा वाजवताे, वाकून नमस्कार करताे आणि नम्रतेनं लीन हाेऊन बसताे, आदराने प्रश्न विचारताे. मंत्र घेताे, निराेप घेताे.मग साधना करून, परत येऊन त्याचा अनुभव सांगताे.एके दिवशी ताे मुलगाही उठला, त्यानं स्नान केलं, हाती फुलं घेतली आणि येऊन त्यानं मंदिराची घंटा जाेरानं वाजवली. झेन फकिरानं मान वर करून पाहिलं, त्याला वाटलं की काेणी साधक आला असावा.
 
पण पाहताे तर हा छाेटा मुलगा, जाे तिथं आजूबाजूला कित्येकदा घुटमळत हाेता. त्याने तीनदा वाकून नमस्कार केला, फुलं पायाशी ठेवली अन् हात जाेडून ताे म्हणाला, ‘मी ध्यानाला उपलब्ध हाेईन असा मार्ग मला सांगा.’ त्या गुरूंनी माेठ-माेठ्या साधकांना मार्ग सांगितला हाेता. पण आता या छाेट्याला काय मार्ग सांगायचा? पण त्याने तर सगळा विधी पूर्ण केला हाेता.त्याला नाकारता येणार नाही. ठीक घंटा वाजवली हाेती, हात जाेडून नमस्कार केला हाेता, चरणी फुलं वाहिली हाेती, विनम्र भावानं बसून प्रार्थना केली हाेती, ‘आज्ञा द्यावी, ध्यानाला उपलब्ध हाेण्यासाठी, प्रभूस्मरण हाेण्यासाठी मी काय करावं?’ त्या छाेट्या मुलाला काय विधी सांगावी?
Powered By Sangraha 9.0