लहान मुलाला आपली आई दिसताच त्याचा आनंद गगणात मावत नाही. निस्वार्थ ्प्रेमाची ही दैनंदिन उदाहरणे आहेत. पण या संसारात अडकलेला जीव पुढे स्वार्थात लडबडला जाताे तेंव्हा त्याला या उदाहरणांची आठवण राहत नाहीृ इतरांकडून आपणाला काय व कसे मिळेल एवढाच विचार हा जीव करीत राहताे. त्यामुळे ताे खऱ्या सुख समाधानापासून दुरावला जाताे.निस्वार्थ प्रेमाची अनुभूती जवळपास सर्वांनाच केव्हाना केव्हा तरी येत असते. या अनुभूतींची आठवण ठेवून वागले तरी खूप आनंद मिळू शकताे. माझ्याच बाबतीतली अनुभूती सांगायची झाली तर पुढीलप्रमाणे सांगता येईल. मी सेवा प्रशिक्षणासाठी मुंबईला गेलाे हाेताे. तेव्हा अचानकपणे मुंबईत दंगल उसळली. मी कसाबसा गांवी परत आलाे. मुलांसाठी कांही वस्तू आणल्या हाेत्या.
पत्नीसाठी कांही आणले नव्हते. मी तिला म्हणालाे गाेंधळामुळे तुझ्यासाठी कांहीच आणले नाही. त्यावर ती म्हणाली मला कांहीच नकाे, आपण सुखरूप परत आलात हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. असे म्हणत ती माझ्याकडे आनंदाने पाहत राहिली. आपल्याही बाबतीत असे घडले असेलच, पण कदाचित आपण हा क्षण विसरत असू.असे क्षण हीच खरी धन, संपदा असल्याने अशा क्षणाचा विसर पडू देऊ नये. जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448