जी व्य्नती विक्षिप्त नाही तीच उपयाेग करू शकते. जी विक्षिप्त आहे ती उपयाेग करू शकत नाही. त्या व्य्नतीचा उपयाेग ती वस्तूच करून टाकते. ती व्य्नती त्या वस्तूंचा सांभाळ करते, सेवा करते, झाडते-पुसते, आणि कधी काळी वापरू अशी स्वप्ने पाहत असते. ‘कधी-काळी वापरू’ ते कधी उगवतच नाही. ती वस्तू त्या व्य्नतीला हसली असती, जर तिला हसता आलं असतं तर.प्रभूचं क्षणभराचं पूर्णस्मरण हेच सतत स्मरण हाेऊन जातं. अपरिग्रही चित्त, अपरिग्रही एकान्तात जगणारं चित्तच प्रभूच्या सतत स्मरणात उतरू शकतं. अन् सतत स्मरणात उतरण्याचा अर्थ आहे- एका क्षणापुरतच जर पूर्णस्मरण झालं तर ते सतत स्मरण बनून जाणं. विसरावं म्हटलं तरी विसरता येत नसतं ते. प्रभूची एक झलक मिळाली तरी प्रयत्नांनीसुद्धा ती विसरता येत नसते.
एका क्षणापुरतंच दार उघडावं आणि त्याला पाहून घ्यावं. बस्स्. मग काहीएक हरकत नाही.नंतर त्याला आपण समाेर पाहत राहिलाे नाही, तरी आत त्याची धून चालूच असेल. श्वासाश्वासाला माहिती असेल, राेम न् राेम ओळखत असेल की, हाेय ताेच हा. ताेच हा. सर्व जीवन धुंदीत आच्छादून जाईल, मात्र एक क्षणभर तरी स्मरण झालं पाहिजे.कृष्ण म्हणताे, ‘सतत, प्रतिक्षण, थाेडंही व्यवधान नसावं, तेव्हा म्हणता येईल की माझ्यात प्रभू प्रतिष्ठित झाला.’ एक क्षणभर झालं तरी निरंतर हाेईल. एक क्षण कसा मिळेल? ताे क्षण मिळण्यासाठी आपण कुठे गेलं पाहिजे? त्याची छबी एकवार डाेळ्यापुढे यावी, दर्शनाचा स्पर्श व्हावा असा क्षण कुठे मिळेल?