उदा. तुमच्या घरातल्या वस्तू तुमचा नाेकर वापरताे. ताे त्या सगळ्या वस्तू वापरताे, नीट उचलून ठेवताे, व्यवस्थित सांभाळताे, उपयाेग करताे, पण तुमची एखादी किमती वस्तू हरवली तर त्याला त्याचा काहीएक त्रास हाेत नसताे. खरं तर वस्तूंशी संबंध तुमच्यापेक्षा त्याचाच जास्त येत असताे. कदाचित त्या वस्तूंशी संपर्क येण्याची तेवढी संधी पण तुम्हाला मिळत नसते. त्या नाेकराने वस्तूंचा उपयाेग जास्त केलेला असताे.तुमच्यापेक्षा जास्त वापर त्याने केलेला असताे.पण ती वस्तू हरवली, तुटली-फुटली, चाेरीला गेली तर नाेकराला थाेडीसुद्धा हुरहुर वाटत नसते. ताे त्या रात्रीही आपला नेहमीप्रमाणे शांत झाेपी जात असताे. काय भानगड आहे?
ताे वस्तूंचा उपयाेग तर करीत हाेता, पण वस्तूंशी त्याचा काेणताही जिव्हाळ्याचा संबंध नव्हता. पण समजा एखादी वस्तू फुटली तरउदा. एखादं घड्याळ राेज साफसूफ करीत असे.ते पडून फुटलं तरी नाेकराबाबत आतून काहीही फुटत नसतं. कारण त्या घड्याळानं त्याच्या आत काेणतंही स्थान तयार केलेलं नव्हतं. पण घड्याळ फुटल्यानंतर जर तुम्ही त्याला म्हणालात, ‘अरेरे, फार वाईट झालं.आज संध्याकाळी जाताना मी तुला ते भेट द्यावं म्हणत हाेताे.’ तर मग त्या रात्री त्याचा डाेळ्याला डाेळा अजिबात लागणार नाही. घड्याळाशी एक जिव्हाळ्याचा संबंध निर्मित झाला. आता जे घड्याळ नाहीये, त्याच्याशी सुद्धा त्याचा ममत्वाचा संबंध निर्माण झाला.