त्यांनी म्हटलं -‘काढू कधी तरी बाहेर आज तर आत्ता पाऊस पडताेय, उगीच रंग खराब नकाे व्हायला.’ कधी खूप ऊन असतं म्हणून रंग खराब हाेताे... त्यांनी स्कूटर बाहेर काढलेली काही मला बघायला मिळाली नाही.सगळ्यांच्याच जवळ या स्कूटरसारख्या थाेड्याबहुत वस्तू असतात. त्या आपण सांभाळून ठेवत असता. स्त्रियांकडे पुष्कळ वस्तू असतात. त्याचं कारण आहे. पुरुष बाहेरच्या जगात व्य्नतींशी अनेक प्रकारचे संबंध बनवून घेतात. आपण पुरुषांनी स्त्रियांच्या सर्व संबंधाची पायमल्ली केलेली आहे.तिला आपण घरात बंदिस्त करून टाकलं आहे. तर पुरुषांचे जगात अनेक प्रकारचे संबंध प्रस्थापित हाेऊ शकतात. पार्टी, ्नलब, संघ, मित्र, हे न् ते. हजाराे उपाय. बाहेरच्या जगात फिरून ताे पुष्कळ प्रकारचे संबंध घडवून आणीत आला आहे.
पण स्त्रीला आपण घरात बंद करून टाकलंय.घराबाहेर तिचा आपण काेणताही संबंध घडवून न आणल्यामुळे तिची तहान, अतृप्ती तिच्याकडून असं करून घेणारच. त्यामुळं स्त्रिया वस्तूंसाठी अक्षरश: वेड्या हाेतात.माझ्याकडे कित्येक स्त्रिया येतात. त्या म्हणतात, आम्हाला संन्यास घ्यायचाय. पण अडचण अशी आहे, की तीनशे साड्या आहेत.बाकी काहीच अडचण नाही, अन् संन्यास घेण्यात आम्हाला काही कष्ट पण नाहीत. अडचण एवढीच की त्या तीनशे साड्यांचं काय करायचं? अन् हा एकीचा मामला नाही. किती स्त्रियांनी येऊन मला सांगितले आहे, ‘संन्यास मनाला बराेबर पटताे.