गीतेच्या गाभाऱ्यात

16 Jun 2023 13:59:45
 
 
पत्र विसावे 
 
Bhagvatgita
 
या ठिकाणावर सुख अनुभवायचे व आणखी सुख मिळण्याकरता पुन्हा त्रासाच्या पायऱ्या चढू लागावयाचे.तू विचारतेस - ‘‘काही लाेक म्हणतात - तत्त्वज्ञानी माणसाने पाेषाखाकडे लक्ष देऊ नये. त्याने कसाही गबाळग्रंथी पाेषाख करावा. त्याचप्रमाणे त्याने भाषणाबद्दल देखील बेफिकीर असावे. त्याने काही भाषण केले तरी चालेल. तुम्हाला काय वाटते?’’ - मला वाटते - हे मत बराेबर नाही. तत्त्वज्ञानी लाेकांचा अग्रणी म्हणजे कृष्ण. कृष्ण पाेषाख कसा चांगला करताे! ताे भाषण कसे सुंदर करताे! सुंदर पाेषाख आणि सुंदर भाषण हे तर कृष्णाचे वैशिष्ट्य आहे. पाेषाख व भाषण या बाबतीत गबाळग्रंथीपणा न करता आपण नीटनेटकेपणा ठेवला पाहिजे. इंग्लिश शब्दांचा उपयाेग करून आपणास असे म्हणता येईल की - ऊीशीी व अववीशीी याबद्दल आपण चाेखंदळपणा ठेवला पाहिजे.
 
तू उपदेशाबद्दल विचारले आहे. त्या बाबतीत असे दिसते की - लाेकांना अनुभव असताे कणभर पण ते उपदेश करतात मणभर.
तू गीतेच्या तत्त्वज्ञानाने भारावून गेली आहेस. तू स्वतः पुरता असा महामंत्र लक्षात ठेव की - अनुभव असावा मणभर आणि उपदेश करावा कणभर सुखाबद्दल तुझ्या पत्रांत कांही विचार आहेत. त्या बाबतीत मला वाटते - माणसाला वाटते सुख पाहिजे पण माणसाला असेही वाटते की चमचमणारे सुख असल्याशिवाय खरी मजा नाही. माणसाने असे लक्षात ठेवावे की - सुख चमचमते ते दुःखांत, तारे चमकतात ते अंधारात.
 
तुझ्या पुढच्या प्रश्नाचे उत्तर असे की - क्राेधाचा उगम मूर्खपणा असताे, व क्राेधाचा शेवट पश्चात्ताप असताे. आपण क्राेधावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर क्राेध आपल्यावर ताबा मिळवताे.पत्राच्या शेवटी तू हृदयाला जाऊन भिडणारा मजकूर लिहिला आहेस. तू लिहितेस - ‘मला पुष्कळदा वाटते की मी मॅट्रिक देखील नाही. तुम्ही खूप शिकलेले. तुम्हाला खूप स्काॅलरशिप मिळालेल्या. तुमची शैक्षणिक पात्रता हेवा वाटण्यासारखी. अशा परिस्थितीत जिला विशेष शिक्षण नाही अशी मी तुम्हाला कितपत याेग्य आहे?’ एकदा तुम्ही मला म्हणाला - ‘गीतेने पुनर्जन्म मानला आहे. बड्या बड्या शास्त्रज्ञांना पुनर्जन्म मान्य नाही. त्यांचा पुनर्जन्मावर अजिबात विश्वास नाही.
 
या बाबतीत निश्चित निर्णय देणे कठीण आहे, पण जर पुनर्जन्म असेल तर पुढल्या जन्मी देखील तूच माझी पत्नी व्हावीस असे मला वाटते.’ तुम्ही म्हटल्यावर माझ्या डाेळ्यात एकदम पाणी आले.तुम्ही मला विचारले - ‘‘रडायला काय झाले?’’ इत्नयात काही लाेक तुमच्याकडे आल्यामुळे ताे विषय तेथेच थांबला.‘‘अहाे! माझ्या डाेळ्यात जे अश्रू आले ते आनंदाश्रू हाेते.तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाने माझ्यासारख्या विशेष शिक्षण नसलेल्या स्त्रीला पुढच्या जन्मी देखील पत्नीपद द्यावे त्यापरते माझे भाग्य ते काेणते? असल्या भाग्यापरते स्त्रीचे दुसरे काेणते माेठे भाग्य असणार?
Powered By Sangraha 9.0