तैसा जाे आत्मज्ञानी नर । तयास नावडे इतर ।।1।।

14 Jun 2023 14:44:30
 

saint 
 
श्रवणाचे महत्त्व मागील समासात वर्णन केल्यानंतर श्रवण करावे हे खरे; पण काय श्रवण करावे याचे मार्गदर्शन श्रीसमर्थ या नवव्या समासात करीत आहेत. केवळ काहीही ऐकणे हे श्रवण त्यांना अपेक्षित नाही. तर ज्याच्या याेगाने परमार्थ साधेल असे आणि केवळ असेच श्रवण करावे, असा त्यांचा आग्रह आहे. या समासाचा प्रारंभ म्हणूनच ते आता श्रवण कैसें करावे । ते सांगिजेल अवघे । असा करतात. आपले समाधान भंग पावेल आणि ब्रह्मज्ञानाचा निश्चय माेडेल असे वक्तृत्व अथवा ग्रंथ यांचा त्याग करावा. ज्यामुळे संशय आणि संभ्रम वाढेल असेही श्रवण टाळावे.
 
ज्यायाेगे परमार्थाचे बीज राेवले जाईल, ज्याच्या मनामध्ये ते आधीच रुजले आहे तेथे जाेमाने वाढेल आणि जेथे परमार्थवृक्ष बहरलाच आहे अशाच्याअंत:करणात ताे बहर कायमचा टिकेल अशाच तऱ्हेचे श्रवण, वाचन आणि मनन केले पाहिजे.ज्याची आपल्याला गाेडी असते ते ऐकावयास मिळाले तर सुखाचे असते आणि ज्या मार्गाची आपली उपासना असते, त्याच मार्गाचे श्रवण आनंद देते. श्रीसमर्थ अद्वैत मताचे आहेत म्हणून त्यांनी येथेही अद्वैत मताचाच पुरस्कार करून अद्वैत ग्रंथांचेच महत्त्व सांगितले आहे. ज्यालापरमार्थमार्गाची गाेडी लागली आहे त्याला माेक्षाची तळमळ असते आणि त्यासाठी त्याने आत्मानात्म विवेक प्राप्त करून देणाऱ्याअद्वैत ग्रंथांचेच वाचन केले पाहिजे.पाणी जसे उतारावरच सहजपणे जाते तसेच या अद्वैतप्रीतीचे आहे. ती मिळाली की मग त्याला अद्वैतग्रंथांची ओढ आपाेआपच लागते.
Powered By Sangraha 9.0