कीं श्लाेकाक्षरद्राक्षलता। मांडव जाली आहे गीता। संसारपथश्रांता। विसंवया।। (18.1669)

14 Jun 2023 14:38:03
 
 

Dyaneshwari 
 
गीतेवरील भाष्याच्या समाप्तीनंतर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीचा समाराेप माेठ्या विस्ताराने व बहारीने करीत आहेत. जेथे श्रीकृष्ण, लक्ष्मी व अर्जुन आहे तेथे विजय आहे हे तर खरेच. व्यासांचे बाेलणे कधी खाेटे ठरणार नाही.लक्ष्मीसहित कृष्ण, भक्तांचा समुदाय आणि सुखाची परमावधी असे हे नाते आहे.याप्रमाणे बाेलून संजयाने भारताचे तात्पर्य एका श्लाेकात आणून धृतराष्ट्राच्या हातात दिले. अग्नी केवढा माेठा आहे? तर ताे वातीच्या टाेकावर ठेवून पहावा. वेद अनंत, सव्वालक्ष श्लाेकांचे भारत आणि यांतील सातशे श्लाेकांत गीता आहे. या गीतेचा शेवटचा श्लाेक म्हणजे गीतेचे तात्पर्यच हाेय. गीतेचा सर्व बाेध आपल्या अंगी धारण करणाऱ्या श्लाेकांना श्लाेक म्हणावे की गीतारूपीआकाशातील परमामृत म्हणावे? अथवा आत्मराजाची सभा म्हणजे गीता आहे.
 
या गीतारूपी सभेला सातशे श्लाेकांचे खांब लावले आहेत. गीता ही सप्तशतीच्या मंत्रांनी उपदेश करणारी देवी असून माेहरूपीमहिषासूराच्या नाशाने ती आनंदित झाली आहे. मनाने, शरीराने अथवा वाचेने जाे गीतादेवीचा सेवक हाेईल, त्याला स्वानंदसाम्राज्याची प्राप्ती हाेईल.अविद्यारूपी अंधारावर मात करील. किंवा संसाररूपी रस्त्यावर चालताना श्रमलेल्या लाेकांना विश्रांती घेण्यासाठी श्लाेकांच्या अक्षररूपी द्राक्षांच्या वेलीला गीता मांडव झाली आहे.भाग्यवान संतरूपी भ्रमरांनी या श्लाेकरूपी कमलांचा आस्वाद घेतला आहे. गीतारूपी ही वेल श्रीकृष्ण नावाच्या सराेवरात प्रुल्ल झाली आहे. हे श्लाेक म्हणजे गीतेचा महिमा वर्णन करणारे भाटच आहेत. सातशे श्लाेकांचा भक्कम काेट करून सर्व शास्त्रे गीतारूपी शरीरात रहावयास आली आहेत. ही गीता म्हणजे श्रीप्रभूची वाययीन मूर्ती आहे. गीतारूपी रथाचे हे श्लाेक म्हणजे घाेडेच आहेत.
Powered By Sangraha 9.0