बाेध : एकाग्रचित्ताने काेणतीही गाेष्ट श्रवण केल्यास ती मनाला भिडते; अंतर्मनात ठसते आणि तिचे अपार ायदे मिळतात. अर्थात हे चांगल्या गाेष्टींचेच श्रवण असावे.
वाच्यार्थ : पक्ष्यांमध्ये कावळा, प्राण्यांमध्ये कुत्रा, मुनींमध्ये काेपिष्ट मुनी आणि सर्वसामान्यांमध्ये जे निंदक आहेत, ते सर्व ‘चांडाळ’ समजले जातात.
भावार्थ : भयंकर कृत्ये करणाऱ्या अत्यंत रागीट किंवा दृष्ट व्यक्तीला ‘चांडाळ’ म्हणतात.
1. कावळा : पक्षीवर्गामध्ये कावळा हा चांडाळ समजला जाताे; कारण अचानक झडप घेऊन टाेचा मारणे, वाटेल ते अगदी (विष्ठासुद्धा) भक्षण करणे, बारीक नजर असणे ही कावळ्याची लक्षणे.