गीतेच्या गाभाऱ्यात

14 Jun 2023 14:57:55
 
 
पत्र विसावे
 
Bhagvatgita
गीता वाचल्यामुळे त्यांच्या वागण्यात कांही फरक पडताे कां? तुझी शंका चांगली आहे. मी एक ऐकलेली गाेष्ट सांगताे. ती गाेष्ट माेठी मार्मिक आहे.दाेन चाेर हाेते. त्यांचा चाेरीचा धंदा चांगला चालला हाेता. एकदा त्यांना उपरती झाली व ते एका महाराजाकडे गेले. महाराज त्यांनाम्हणाले - राेज तुम्ही गीता वाचत जा. तुमच्या जीवनांत चांगला फरक हाेईल. ते चाेर राेज गीता वाचू लागले. त्यांना वाटू लागले - चाेरी करणे पाप आहे.काही दिवस त्यांनी चाेरी करण्याचे साेडून दिले. जवळ साठलेल्या पैशावर ते गुजराण करू लागले.
एकदा त्यांना पस्तीस रुपयांची जरूरी हाेती. ते समुद्र किनाऱ्यावर गेले. कृष्णाला ते म्हणाले - ‘‘देवा, आम्ही चाेरी करणे साेडून दिले आहे. पण आज आमचे नडले आहे.
 
आम्हांला पस्तीस रुपयांची जरूरी आहे. असे वाटते - चाेरी करावी, पण पुन्हा वाटते चाेरी करू नये. देवा, आम्ही काय करावे ?’’ ते दाेन चाेर जेथे बसले हाेते तेथे एक सुंदर कुत्र्याचे पिल्लू आले. ते दाेन चाेर त्या पिल्लाला खेळवू लागले.इत्नयात एक श्रीमंत मनुष्य तेथे आला व त्यांना म्हणाला - ‘पिल्लू किती छान आहे? मला हे तुम्ही विकत देता का? ते चाेर म्हणाले - ‘‘देताे’’ त्या श्रीमंत गृहस्थाने विचारले - ‘‘काय किंमत?’’ ते चाेर म्हणाले - ‘‘पस्तीस रुपये’’ ताे श्रीमंत गृहस्थ म्हणाला - माझी तुम्ही थट्टा करता आहे कां? समाेर जाे माेठा बंगला दिसताे आहे त्याचा मी मालक आहे. ‘‘हे पिल्लू फार किंमतीचे आहे. तुम्ही बरीच माेठी र्नकम सांगितली तरी मी ती देईन. हे पिल्लू मला फार आवडले आहे. किती किंमत देऊ? ते म्हणाले - ‘‘फ्नत पस्तीस रुपये’’ त्या श्रीमंत गृहस्थाने पस्तीस रुपये दिले व ते पिल्लू घेऊन ताे आपल्या बंगल्याकडे गेला.
 
थाेड्या वेळाने त्या पिल्लाचा मालक आला ताे त्या चाेरांना म्हणाला ‘माझे पिल्लू हरवले आहे. तुम्ही जर ते हुडकून दिले तर तुम्ही मागाल ती किंमत मी देईन.’ ते चाेर म्हणाले - ‘आम्ही ते पिल्लू हुडकताे. जर ते सापडले तर आम्हाला पस्तीस रुपये द्या.’ मालक म्हणाला - ‘तुम्ही माझी थट्टा करता आहे का! मी खूप श्रीमंत आहे. माझे पिल्लू फार किंमतीचे आहे. ते माझे फार लाडके आहे. ते तुम्ही हुडकून दिले तर तुम्हाला मी तुम्ही मागाल तितके पैसे देईन.ते चाेर म्हणाले - ‘‘ते पिल्लू सापडले तर आम्हाला फ्नत पस्तीस रुपये द्या.मालक म्हणाला - ‘‘बरं’’ ते चाेर त्या श्रीमंत गृहस्थाच्या बंगल्यात गेले व म्हणाल
Powered By Sangraha 9.0