मनुष्याचे केस काळ्याचे पांढरे हाेतात, ताे पांढऱ्याचे पुन्हा काळे करताे.डाय लावताे.कलप करताे.ठीक आहे! मी आपल्या खासगी जीवनात डाेकावणार नाही; पण इतके मात्र जरूर सांगेन की, ज्याप्रमाणे पांढरे केस डाय लावून काळे करता, अगदी त्याचप्रकारे सत्संग आणि प्रार्थनेची डाय लावून काळ्या मनाला पांढरे शुभ्र जरूर करा. सत्संग ती डाय आहे, जी काळ्या मनाला पांढरे करते. केस तर वेळ येताच काळ्याचे पांढंरे हाेतात; पण मन ... ?