ओशाे - गीता-दर्शन

13 Jun 2023 15:28:54
 
 

Osho 
 
वस्तू गाेळा करीत राहताे. त्यांचा मालक हाेणं साेपं असं त्याला वाटतं. त्यांच्याशी भांडण, झटापट - छे प्रश्नच नाहीये. वस्तू काय- जशा असतात तशाच राहतात. जे त्यांना सांगावं. त्याप्रमाणे त्या करतात. त्यामुळे हळूहळू माणूस वस्तूंच्या मालकीला डाे्नयावर घेत आहे. जितकं जुन्या जगात जाऊ तितके व्य्नितगत संबंध जास्त आढळतील. जितके आजच्या जगात येऊ. तेवढे व्य्नती-व्य्नतींचे संबंध कमी, अन् व्य्नतींचे वस्तुंशी संबंध जास्त हाेत जातील. त्यामुळे भविष्यकाळाच्या दृष्टीने अपरिग्रहाचं सूत्र फारच विचार करण्यासारखं आहे.भविष्यात परिग्रह खूपच वाढत जाईल.वाढत चालला आहे. राेज वाढताे आहे. आज युराेपात नवी म्हण प्रचारात आली आहे.- बालकाला जन्म देण्यापेक्षा कार खरीदणं बरं.’ तिथे जाेडपी असा विचार करतात की मुलाला जन्म द्यायचा की फ्रिज घ्यायचा, की कारचं नवं माॅडेल आलंय ते घ्यायचं, की टीव्ही घ्यायचा असा विकल्प आहे.
 
कारण एक बाळ जेवढा खर्च आणतं तेवढ्या खर्चात एक नवी कार घेता येते. शिवाय कार जरा जास्त भरंवशाची आहे. कुठंही न्या, कुठंही थांबवा, नकाे तिथे नका उभी करू - जे करायचं ते करा. विराेधही करीत नाही, उत्तर पण देत नाही, झंझट पण करीत नाही. राग आला तुम्हाला अन् तुम्ही लाथा मारल्या तिला, शिवीगाळ केली तरी सारं गुपचूप सहन करते बिचारी! म्हणून आपला वस्तूंबाबतचा आग्रह वाढत चालला आहे. माणूस आपल्याभाेवती वस्तूंचं एक साम्राज्य उभारताे अन् त्यात मध्यभागी सम्राट हाेऊन बसताे. की मी मालक आहे.व्य्नतींना एकत्र करून अशी मालकी गाजवणं माेठं अवघड आहे. प्राैढ व्य्नतींना एकत्र करणं तर फार अवघढ आहे. प्राथमिक शाळेच्या शिक्षकाला विचारा की पंचवीस-तीस मुलंच फ्नत भाेवती गाेळा हाेतात पण कसा वैताग येताे!
Powered By Sangraha 9.0