ओशाे - गीता-दर्शन

10 Jun 2023 14:50:51
 
 
 

Osho 
जाे इतरांना पराधीन करताे ताे स्वत:लाही पराधीनच करून टाकत असताे. ज्याने दुसऱ्या कुणालाही पराधीन करण्याची याेजनाच बनवली नाही ताेच केवळ स्वाधीन हाेऊ शकताे.व्य्नतीबराेबर गुंतागुंती वाढतच जातात.वस्तूबराेबर मात्र ताे मामला गुंतागुंतीचा अजिबात नाहीये. आपण एक खुर्ची घरातल्या एका काेपऱ्यात आणून ठेवली तर ती तेथेच राहील. कुलूप लावून कित्येक वर्षानंतर जरी परतलात तरी खुर्ची तिथेच मिळेल, माेठीच आज्ञाधारक असते. पण जर पत्नीला, पतीला, मुलाला वा मुलीला असं बसवून जाल तर असं हाेणं अश्नय आहे. आपण परतेपर्यंत सगळं जग पार बदलून गेलेलं असेल. त्याच ठिकाणी बसून राहिलेलं काेणीही भेटणार नसतं.
जिवंत व्य्नितत्वाची आपली स्वत:ची आंतरिक स्वतंत्रता असते, ती काम करील.
 
तिची चेतना असते. ती काम करील. वस्तूकडून आपण अपेक्षा करू शकताे, व्य्नतीकडून अपेक्षा करणं फार कठीण आहे. कारण व्य्नती उद्या काय करील ते काही एक सांगता येत नाही. व्य्नती, अन्प्रेड्निटेबल असते. वस्तूंची भविष्यवाणी हाेऊ शकते. व्य्नतीची भविष्यवाणी हाेऊ शकत नाही. म्हणून माणूस जेवढा मेलेला असेल तेवढं ज्याेतिषी त्याच्याबद्दल बराेबर सांगण्यात सफल हाेतात. जिवंत व्य्नती असेल, तर मात्र ते फार अपघड जातं. ज्याेतिषांकडे मुडद्यांशिवाय काेणी जातं असं दिसत नाही.जिवंत माणूस अन्प्रेड्निटेबल असताे. उद्या काय हाेणार ते काहीएक सांगता येत नसतं.जिवंत माणूस म्हणजे एक स्वतंत्रता असते.तर व्य्नतीबाबत माेठीच अडचण हाेऊन जाते. म्हणून मग माणूस हळूहळू व्य्नतीच्या मालकीचा नाद साेडून देताे.
Powered By Sangraha 9.0