तैसा विद्याविनाेदविभवें। देखे पुढिलांची दैवें। तंव तंव राेषु दुणावे। क्राेधु ताे जाण । (16.242)

09 May 2023 14:22:55
 
 

Dyaneshwari 
 
दैवी संपत्तीचे गुणवर्णन केल्यानंतर ज्ञानेश्वर तितक्याच विस्ताराने आसुरी संपत्तीचे वर्णन करीत आहेत. आसुरी संपत्ती वा अज्ञान यांचे विस्ताराने वर्णन का याचे उत्तर मागे तेराव्या अध्यायात आपण पाहिले आहे.दांभिकपणा, मस्ती, अभिमान, क्राेध, निष्ठुरपणा, अज्ञान इत्यादी गुण आसुरी संपत्तीचे आहेत. अशा प्रकारच्या माणसास आपल्या मान्यतेचा माेठा ताठा असताे.ताे ईश्वराला मानीत नाही. वेदांना जुमानीत नाही.आपला माेठेपणा ताे मिरवीत असताे. त्याला देवाचे नावही सहन हाेत नाही. असा अभिमानी पुरुष उन्मत्त बनलेला असताे.तापलेल्या तेलाची व थंड पाण्याची भेट झाली की तेलात ज्वाला निर्माण हाेतात, अथवा ज्याप्रमाणे चंद्रालाहून काेल्हा मनात जळत असताे, सूर्याच्या याेगाने विश्वाचे आयुष्य उजळते. पण घुबडाचे डाेळे मात्र बंद हाेतात, जगाला पहाट झाली की सुख हाेते, पण चाेरांना ती मरणापेक्षा वाईट वाटते.
 
सर्पाला पाजलेले दूध विषमय हाेते.समुद्राचे पाणी पीत-पीत वडवानल अधिकच भडकताे.त्याची कधी तृप्ती हाेत नाही. त्याप्रमाणे विद्या, विनाेद, ऐश्वर्य इत्यादी गुणांचे दर्शन इतरांत झाले की, ज्याचा संताप हाेताे त्याला क्राेध म्हणावे. अशा मनुष्याच्या मनात सर्पाचे वारूळ असते. त्याचे डाेळे म्हणजे बाणांची वृष्टी असते. त्याचे बाेलणे म्हणजे निखाऱ्यांचा वर्षाव असताे.त्याच्या सर्व क्रिया पाेलादाच्या करवतीसारख्या असतात.त्याचे अंत:करण अत्यंत कठाेर असते. असा मनुष्य अधम समजावा. कठीणपणाची ताे मूर्तीच आहे असे मानावे.यानंतर ज्ञानेश्वर अज्ञानाचे वर्णन करतात. दगड थंड वा उष्ण हे विकार जसे जाणीत नाही, त्याप्रमाणे अज्ञानी मनुष्यास तारतम्य समजत नाही.
Powered By Sangraha 9.0