सूर्यकिरणं तुमच्या आरपार जाताहेत.तुम्हाला त्याच्याशी लढावं लागणार नाही.संध्याकाळीही हा त्रास हाेणार नाही. सूर्यकिरण पुन: एकदा आरपार जाताहेत. म्हणुन हळुहळू प्रार्थनेचं नाव संध्या असंच पडलं. ‘संध्या’ चा अर्थ हा आहे की असा क्षण जेव्हा सूर्यकिरणं आरपार जाताहेत.सकाळ असाे वा संध्याकाळ. मधला काळजेव्हा सूर्याचा तुमच्यावर सरळ प्रभाव पडत नाही. पण रात्री बारा वाजता मध्यरात्री फायदा हाेऊ शकताे.याेग्यांनी त्याचा उपयाेग केलेला आहे.कारण तेव्हा सूर्य बराेबर तुमच्या खालच्या बाजूला पाेहाेचताे.
आणि सूर्यकिरणं आता तुमच्या शरीरात काम-केंद्रापासून सहस्त्राराकडे जाऊ लागतात. डाेळ्यांना ते दिसत नाही पण अंतरीक्षामध्ये हा प्रवास चालू आहे. तेव्हा नदी सरळ वाहात असते. आपण तीत उतरलात तर अनायासे तराल.कदाचित् पाेहण्याची देखील काही गरज भासणार नाही. फ्नत प्रवाहात स्वतःला वाहून घ्या. वाहून जा जस्ट फ्लाेट आणि आपण वरच्या दिशेने निघून जाल.पण दुपारच्या वेळी सूर्य आपल्या वरून खाली अशी यात्रा करीत आहे. त्यावेळी आपण केवळ वाहत जाऊ शकणार नाही. पाेहणेदेखील अवघड हाेईल, कारण सूर्याचे किरण हा तुमच्या जीवनाचा आधार आहे.सूर्य जीवन आहे. त्याच्याशी लढाई ही एक अवघड गाेष्ट आहे. म्हणून सूर्यावर त्राटक सुरू झाले.