अहिंसा, सत्य, क्राेधराहित्य इत्यादी गुणांचा दैवी संपत्ती म्हणून उल्लेख केल्यावर ज्ञानेश्वर अहंतेचा त्याग, शांती इत्यादी गुणांकडे वळत आहेत. मातीचा त्याग केला की घटाचा आपाेआपच त्याग हाेताे. सुताचा त्याग केला की वस्त्राचा त्याग हाेताे. झाेपेचा त्याग केला की स्वप्नांचा त्याग आपाेआप हाेताे. त्याप्रमाणे बुद्धिवान पुरुष अहंतेचा त्याग करताे.यानंतर ज्ञानेश्वर शांती या लक्षणाचे वर्णन करीत आहेत. जे जाणावयाचे त्याला गिळून ज्ञानदेखील तेथे उरू न देणे ही शांती हाेय. प्रलयकाळचा पाण्याचा लाेट सर्व विश्वाचा पसारा बुडवून आपल्या ठिकाणी भरून असताे.त्याप्रमाणे ज्ञेयाचा लय झाल्यावर ज्ञातेपणही नाहीसे हाेते. हेच शांतीचे रूप हाेय. राेग नाहीसा करण्यासाठवैद्य आपले अथवा परके असे पहात नाही आणि काळजीपूर्वक औषधाची व्यवस्था करताे.
गाळात फसलेली गाय दिसल्यावर ती दूध देणारी आहे की भाकड आहे याचा विचार न करता ज्ञानी मनुष्य कासावीस हाेताे. दयावान पुरुष बुडणारा मनुष्य ब्राह्मण आहे की चांडाळ हे पहात नाही. एखाद्या अरण्यात नेऊन दुष्ट माणसाने एखाद्या स्त्रीला उघडी केली असेल तर सभ्य मनुष्य तिला वस्त्र नेसवल्यावाचून तिच्याकडे पहात नाही. त्याप्रमाणे अज्ञान, उन्मत्तपणा, वाईट नशीब, निंद्यपणा इत्यादींनी सर्व जखडलेले आहेत. त्यांची दु:खे दूर करण्याचे काम ज्ञानी पुरुष करीत असतात. दुसऱ्याचे दाेष दूर करून त्याकडे पहावे. देव पुजून पहावा. धान्य पेरून मग शेतात जावे. त्याप्रमाणे दुसऱ्याचा कमीपणा दूर करून त्याच्याकडे पहावे. काेणाच्या वर्मावर बाेट ठेवून बाेलू नये. पापकर्मात काेणास गुंतवू नये. नीच पुरुषाला बराेबरीने वागवावे. असे हे अपैशून्याचे लक्षण आहे.ं