गीतेच्या गाभाऱ्यात

06 May 2023 17:19:36
 
 
पत्र पंधरावे
 
Bhagvatgita
 
ह्नस्लेने समाजाला जंगलात तयार केलेल्या बगीच्याची उपमा दिली आहे बागेमध्ये राेपांची संख्या मर्यादित ठेवली नाही तर बागेचे जंगलात रूपांतर हाेईल.स्वामी रामतीर्थ म्हणतात- ‘‘सध्या लाेकसंख्येची इतकी वाढ झाली आहे की, पुष्कळ मुले हाेणे हे ईश्वरी कृपेचे द्याेतक नसून ईश्वरी काेपाचे ते निदर्शक आहे. मेल्यानंतर स्वर्ग मिळण्याचे बाजूलाच राहाे पण दरसाल नवा पाळणा बांधल्यामुळे जिवंतपणीच घराला नरकाचे स्वरूप येत आहे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या बेचाळीस ते सेहेचाळीस श्लाेकांत भाेग आणि ऐश्वर्य यांच्या लालसेने स्वर्गप्राप्तीची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या कर्मठावर कृष्णानं जाे ताशेरा झाडला आहे त्यात वंशच्छेद झाला म्हणजे पितरांच्या पिंडाेदक क्रिया
 
लुप्त हाेऊन त्यांना स्वर्गाचे दरवाजे बंद हाेतील. या अर्जुनाच्या वेडगळ समजुतीवर परमात्मा कृष्णाचा विशेष कटाक्ष हाेता. या पांच श्लाेकांत ज्या तेजस्वितेचा उपदेश आहे ती ते तेजस्विता अंगी बाणवून घ्या.लग्न करावे, पाेरे हाेऊ द्यावीत, आणि गुलामगिरीत मरावे हेच आपल्या जीविताचे ध्येय झाले आहे!-’’ त्या काळी रामतीर्थांनी मांडलेले हे विचार पाहून तुला आश्चर्य वाटेल.तू हेही लक्षांत घे की उच्च मानसिक श्नतीच्या वाढीबराेबर मनुष्याच्या ठिकाणाची प्रजाेत्पादक श्नती कमी कमी हाेत जाते हे स्पेन्सरने सिद्ध करून दाखवले आहे. उच्च मानसिक श्नतीची वाढ न करता हिंदुस्थानात प्रजाेत्पादनश्नतीला महत्त्व दिल्यामुळे हिंदुस्थानचा ऱ्हास झाला.
 
तू आपल्या पत्रांत लिहितेस-‘‘गीता हे वेदांताचे सुंदर सार आहे. आपल्या वेदांताबद्दल अथवा हिंदूंच्या प्राचीन तत्त्वज्ञानाबद्दल पाश्चात्त्य विद्वानांनी स्तुती केली आहे काय? केली असल्यास ती जाणून घेण्याची माझी फार इच्छा आहे’’ शाेपेन हावरने म्हटले आहे- ‘‘वेदान्ताइतके उच्च, उन्नत व उदात्त तत्त्वज्ञान काेणत्याही धर्मात किंवा तत्त्वज्ञानांत आढळून येणार नाही. वेदान्ताच्या अध्ययनानेच माझ्या आयुष्याचे दिवस सुखाचे गेले, आणि वेदान्ताच्या अध्ययनानेच मरणसमयी मी सुखाने मरेनप्रख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ व्ह्निटर कुसिन म्हणताे- ‘‘प्राचीन हिंदूंचे तत्त्वज्ञान इतके उदात्त, उन्नत व सूक्ष्म आहे की, त्या तत्त्वज्ञानाशी पाश्चात्त्य पंडितांच्या ग्रंथाची तुलना करणे म्हणजे ऐन दुपारच्या सूर्यापुढे अग्नी ठेवण्याप्रमाणे आहे.
 
आर्यांच्या वेदान्तसूर्यापुढे पाश्चात्त्य तत्त्वज्ञान खद्याेतासारखे वाटते.’’ प्रख्यात जर्मन ग्रंथकार इलेगेल म्हणताे- ‘‘हिंदूंच्या तत्त्वज्ञानाच्या भराऱ्या पाहिल्या म्हणजे पाश्चात्त्य तत्त्वज्ञान्यांचे विचार एखाद्या उंच - प्रचंड माणसापुढे एखादा बुटका व हाडकुळा माणूस उभा करावा असे दिसते.’’ मॅ्नसमुल्लर म्हणताे- ‘‘जगातील सर्व धर्माचे व तत्त्वज्ञानांचे आजन्म परिशीलन केल्यावर माझेही मत शाेपेन हाॅवर यांच्याप्रमाणे झाले आहे.माझा आयुष्यक्रम सुखाचा हाेण्यास वेदान्तच कारणीभूत झाला आहे. मृत्यू सुखाने यावा हे जर तत्त्वज्ञानाचे साध्य असेल, तर वेदान्ताइतके दुसरे काेणतेही तत्त्वज्ञान उपयाेगी पडणार नाही.’’
Powered By Sangraha 9.0