जे आपण कधी पाहिलेच नाही त्याची कल्पना आपण करूच शकत नाही. म्हणजेच कल्पनेला वास्तवाचा आधार (base) लागताे, त्याचप्रमाणे ‘माया’ असणारे जगन् निर्मितीसाठी सत्याचे, ब्रह्माचे अधिष्ठान (base) जरूरी आहे. या परमसत्याच्या बळावरच पृथ्वी स्थिर, सूर्य तेजस्वी आणि वायू गतिमान आहे.
बाेध : ईश्वरी इच्छेशिवाय (अंतिम सत्याच्या बळावरच) या जगात ब्रह्मांडात तृणाचे पानदेखील हलत नाही.
ईश्वरेच्छाबलिर्यसी!