ज्याप्रमाणे ईश्वर आहे असे म्हणणारे लाेक समाजात आहेत त्याप्रमाणे ईश्वर नाही म्हणणारेही लाेक समाजात आहेत. जे ईश्वराच्या अस्तित्वाला मानत नाहीत. त्यांच्या बाबतीत ईश्वराबद्दल बाेलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही .पण जे ईश्वराचे अस्तित्व मानतात, त्यांच्या बाबतीत ईश्वराबद्दल बाेलावे लागेल. खराेखर जर ईश्वर आहे, तर मग ताे काेठे आहे? ताे काेणाला दिसला का? दिसला असेल तर त्याचे स्वरुप काय आहे? असे अनेक प्रश्न आपल्या डाेळ्यासमाेर उभे राहतात. आजकाल अनेक ढाेंगी, भाेंदू लाेक आपणाला ईश्वर भेटल्याचा व आपणच ईश्वर झाल्याचा कांगावा करतात.
पण खरे संत महात्मे ईश्वराच्या स्वरुपाबद्दल बाेलतांना त्याचा अंतपार काेणालाही लागणे शक्य नसल्याचे म्हणतात. सर्व जीवमात्रात भरून उरलेल्या, समता, बंधुता, निस्वार्थ प्रेम, कर्तव्याचा संदेश देणाऱ्या ईश्वराचा पार लागणे कठीण असल्याचे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, काेणत्याचा पार पाववी धुंडिता । पुढे विचारिता विश्वंभरा ।। समता, बंधुता, निस्वार्थ प्रेम, कर्तव्य, जबाबदारीचा, स्वपरिचयाचा संदेश देणारे अनेक लाेक ईश्वरस्वरुप हाेऊन गेल्याचे आपण पहाताे. जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448