ओशाे - गीता-दर्शन

30 May 2023 23:47:28
 
 
 
Osho
 
जागे असलात तरी चालूच, झाेपलेले असलात तरीही चालूच.जसा श्वास चालताे तसंच प्रभूचं स्मरण, प्रभूची तहान, प्रभूशी तल्लीनता आतून चालू राहिली तर नेमका अर्थ हाेईल, तर निरंतरचा अर्थ उमगेल.पण आपल्याला तर एक क्षणभरसुद्धा प्रभूचं स्मरण करणं कठीण आहे. मग निरंतर स्मरण तर अश्नयच आहे. जेव्हा आपण क्षणभरहीस्मरण करताे तेव्हासुद्धा प्राण अंतर्यामी व्याकूळ हाेत नाहीत, त्यात प्राण पूर्णपणे संलग्न हाेत नाहीत. आपण वरवरच, साद घालत असताे तेही वरवरचं असतं. त्याचा प्रभाव, प्राणांमध्ये खाेलवर हाेत नाही.आणि कृष्ण तर म्हणताे आहे की, ‘प्रभूकडे अशी निरंतर वाहणारी व्य्नतीच मला उपलब्ध हाेते, प्रभूला उपलब्ध हाेते, प्रभूमध्ये प्रतिष्ठा पावते.’ म्हणजे याचा अर्थ असा झाला की, बाकीचे सगळे जण निराश व्हायला पाहिजेत.
 
साद घालणं क्षणभरही हाेत असेल तर ती ‘निरंतर’ हाेण्याचा प्रश्नच कुठे येताे! गाेष्ट अगदी स्पष्ट आहे, सरळ आहे की साऱ्यांनी निराश व्हावं. आणि जाे कुणी- निरंतरचा हा अर्थ समजेल, ताे प्राथमिक स्वरूपात निराश हाेऊन जाईल की - ‘मग आपल्यासाठी काही मार्ग, दरवाजा दिसत नाही.’ नाही, निराश व्हायचं काही एक कारण नाहीये. यावरून एवढचं सिद्ध हाेतंय की आपणास स्मरणप्रक्रियेचीच माहिती नाही. आणि आपणास हे सांगून ठेवताे, की जी व्य्नती फ्नत एक क्षणापुरतंही नीट स्मरण करील, तिची सतत स्मरणाची व्यवस्था आपाेआपच निश्चित हाेते.का? कारण आपल्याला एका क्षणापेक्षा जास्त काळ कधीही मिळत नसताे.
Powered By Sangraha 9.0