तरुणसागरजी

24 May 2023 14:20:20
 
 

Tarunsagarji 
तुम्ही जर आई- वडील असाल, तर मुलांसाेबत आत्मीयतेने वागा. त्यांच्यापासून दूर राहू नका. आपल्या मुलांसाठी थाेडासा वेळ जरूर काढा.त्यांच्यासाेबत बसा, गप्पा मारा. कारण तुमची मुलेच तर तुमची सर्वांत माेठी संपत्ती आहे.पैसा कमावण्यात इकडे रंगून जाऊ नका की, तुमची मुले तुमच्या हाताबाहेर जातील.मुले बिघडल्यानंतर पैसा कमवून तरी काय करणार? त्याला वाईट संगतीपासून वाचवा, दूर ठेवा, नाहीतर उद्या तुमचे खूपच वाईट हाेईल.
Powered By Sangraha 9.0