दृष्टि नासाग्र आहे आणि आज्ञाचक्रावर आघात हाेत आहे, अशा वेळी जर आपल्या चित्तात कामवासनेचा छाेटासा जरी तरंग उठला तरी ताे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न चालू हाेता ताे बंद पडलाच म्हणून समजा.मग आपली समस्त जीवनऊर्जा खालच्या दिशेने वाहून जाईल. कारण ज्याची आठवण येते त्याच केंद्राकडे जीवनऊर्जा वाहू लागते.आपण कधी विचार केला आहे का? जेव्हा कामवासनेचा विचार येताे तेव्हा लगेच जननेंद्रियाजवळचं केंद्र सक्रिय हाेते. विचार तर डाे्नयात येताे, पण जननेंद्रियाजवळचं केंद्र सक्रिय हाेतं. एवढंच काय, कित्येकदा असं हाेतं, कामकेंद्र सक्रिय हाेतं तेव्हा कुठे तुम्हाला पत्ता लागताे की, ‘अरे आपल्यात कामवासनेचे विचार चालू आहेत.’ कामकेंद्र हळूहळू मागे येत राहतं.विचार तर तिकडे मस्तकात चालताे आणि हे केंद्र तर खूप दूर आहे. ते सक्रिय हाेतं. त्याची पण किल्ली तीच आहे.
जर आपला कामवासनेचा विचार चालला असेल, तर आपली जीवनऊर्जा कामवासनेच्या केंद्राकडे प्रवाहित हाेऊन जाईल.ध्यानाच्या क्षणी जर कामवासनेचा विचार आला तर आपण आपली वरची यात्रा तर कमी करून टाकालच, पण खालची यात्रा इतकी करून बसाल की तितकी आपण कधीही केली नसेल.म्हणूनच सावध करताेय.नासाग्र दृष्टि अर्धे डाेळे उघडे असताना कामविचार झाल्यास आपण कामवासनेत इत्नया तीव्रतेने पडाल की तित्नया वेगानं आपण साधारणत:सुद्धा कधीच जाऊ शकणार नाही.म्हणूनच कित्येकांना ध्यानप्रक्रिया सुरू केल्यावर कामवासना वाढल्याचा अनुभव येताे त्याचं कारण हेच आहे.