2. आत्मबल - बळाचे बरेच प्रकार आहेत.शस्त्रबल, बाहुबल, धनाचे बळ, बुद्धिबळ, आत्मबल इत्यादी; पण आत्मबल हे सर्वश्रेष्ठ बळ हाेय. बाहुबल आणि शस्त्रबळ असणाऱ्या वाल्या काेळ्याला नारदमुनींच्या आत्मबलाने हरविले. ताे नारदमुनींना मारू शकला नाही, तर नारदांनीच वाल्याचा ‘वाल्मीकी’ केला. बुद्धिबळ, शस्त्रबळ असणाऱ्या चतुर ब्रिटिशांना महात्मा गांधी आणि त्यांच्या अनुयायांनी आपल्या आत्मबलाने भारत साेडून जायला लावले.
3. नेत्रज्याेती - सूर्य चंद्रादि तेजाेगाेल, नक्षत्र, तेलाचे दिवे प्रकाश देतात;