हा जाेर फार महत्त्वाचा आहे. कारण हेच ते ठिकाण, द्वार आहे जे उघडलं तर ऊर्जे चे ऊर्ध्वगमन सुरू हाेते.चक्रांच्या भाषेत बाेलायचं झालं तर आज्ञाचक्राच्या खाली जग आहे आणि त्याच्यावर परमात्मा आहे. जर आपण चक्रांच्या संदर्भात विभाजन केलं तर आज्ञाचक्राच्या खाली दाेन्ही डाेळ्यांच्या मध्यभागाच्या खाली जे शरीराचं जग आहे ते जगाशी जाेडलं गेलेलं आहे. अन् आज्ञाचक्राच्या वरचा मस्तकाचा जाे भाग आहे ताे परमात्म्याशी जुळलेला आहे.आज्ञाचक्रावर जाेर पडणे म्हणजे एक प्रकारची किल्ली आहे. जिच्याद्वारे बंद द्वार उघडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते एक गुप्त कुलूप आहे. हा जाेर म्हणजे ते गुप्त कुलूप उघडण्याचा प्रयत्न आहे.
उदा. काही कुलूपं अशी असतात की ज्यांना किल्ली नसते पण आकडे असतात. आकड्यांचा एक विशिष्ट क्रम लावला की कुलूप उघडते. जाेवर हा आकड्यांचा क्रम बराेबर लागत नाही ताेवर ते कुलूप उघडत नाही.हे जे आज्ञाचक्र आहे त्याच्या उघडण्याची एक गुप्त किल्ली आहे आणि ती गुप्त किल्ली ही आहे की जी विद्युत-ऊर्जा आपल्या डाेळ्यांवाटे बाहेर जाते तीच ऊर्जा एका विशिष्ट काेनात थाेपवून धरण्यानं तिच्या मागचा हिस्सा आज्ञाचक्रावर आघात करू लागताे. या आघातानं दरवाजा हळूहळू उघडताे. हा दरवाजा उघडताच आपण एका नव्याच जगात सूर मारून जाता.आता खालचं जग बंद हाेतं.यांत तिसरी गाेष्ट कृष्णानं सांगितली की ब्रह्मचर्य-व्रतात स्थिर व्हावे. ध्यानाच्या या क्षणी जेव्हा डाेळे अर्धे उघडे आहेत.