पत्र सतरावे
आपले शरीरदेखील रथ आहे. यामध्ये मन बसले आहे.वेदामध्ये म्हटले आहे की, मन इंद्राचा पुत्र आहे. तुला माहीत असेल की, अर्जुनदेखील इंद्राचा पुत्र आहे. या शरीररथाचा ध्वज प्राण आहे. प्राण हा वायुचा पुत्र आहे. ऐतरेय उपनिषदात म्हटले आहे.वायु: प्राणाै भूत्वा नासिके प्राविशत। तुला माहीत असेल की, मारुती हा वायुचा पुत्र आहे.ज्याप्रमाणे अर्जुनाचे सारथ्य कृष्णाने केले म्हणून ताे विजयी झाला. त्याप्रमाणे मनाचे सारथ्य अंतरंगातील दिव्यश्नतीने केले तरच मन विजयी हाेते.गीतेत कृष्णाने म्हटले आहेसर्वस्य चाहं हृदि सन्निविष्ट:। मी सर्वांच्या हृदयात आहे.कृष्ण म्हणजे आपल्या अंतरंगातील दिव्यश्नती.ही दिव्यश्नती जर सारथ्य करत असेल तरच आपले कल्याण हाेते.अर्जुन विषण्ण आहे, कृष्ण प्रसन्न आहे.
विषण्ण व प्रसन्न.हे दाेन शब्द गीता वाचून तू नीट लक्षात ठेव. आपल्या अंतरंगातील दिव्यश्नती प्रसन्न असते. आपले मन विषण्ण असते.अंतरंगातील दिव्यश्नतीच्या सल्ल्याप्रमाणे आपण वागलाे तरच आपला विषण्णपणा जाऊन आपले कल्याण हाेते.जे अंतरंगातील दिव्यश्नतीचा कानाेसा घेत नाहीत ते दु:खीकष्टी असतात, विषण्ण असतात. किती तरी सुखे असूनही ते दु:खी असतात. त्यांचे मनविषण्णतेच्या जाळ्यात अडकलेले असते.तुला एक गाेष्ट सांगताे.रत्नागिरीस असताना तालुका काेर्टाची तपासणी करण्याकरता मी निघालाे हाेताे.बाेटीतून प्रवास करत हाेताे. केबिनमध्ये बसलाे हाेताे.डेकवर एक जाेडपे बसले हाेते. मी तेथे गेलाे. नवरा व नवरी सुंदर हाेते. श्रीमंत हाेते. त्यांना दाेनच उत्तम मुले हाेती. नवरा ्नलास वन ऑफिसर हाेता. मला वाटते हे दाेघे सुखात न्हाऊन निघाले असतील.
पण - बाेलता बाेलता नवरा म्हणाला- ‘‘माझ्यासारखा दु:खी माणूस या जगात नाही. मला नीट झाेप येत नाही. नीट भूक लागत नाही. त्या एका गाेष्टीमुळे मी इतका बेचैन आहे की, मला जीवनात काहीच राम वाटत नाही.’’ मी विचारले- ‘‘काय झाले? ताे म्हणाला- ‘‘मी फार हुशार आहे, पण सरकारने माझ्या खालच्या माणसाला माझ्यापेक्षा वरची जागा वशिल्यामुळे दिली.त्यामुळे मी पराकाष्ठेचा दु:खी आहे. मला कशातच बरं वाटत नाही. आत्महत्येचे विचार माझ्या मनात येतात-’’ पाहिलंस विषण्ण मनाला अंतरंगातील दिव्यश्नतीचे सारथ्य नसेल तर असा काही चमत्कारिक प्रकार हाेताे.नंतर त्या स्त्रीला मी काही प्रश्न विचारले. ती म्हणाली- ‘‘साहेब! मी देखील फार दु:खी आहे. मला नीट भूक लागत नाही, नीट झाेप येत नाही. मला जीवनात रस वाटत नाही.’’ मी कारण विचारल्यावर ती म्हणाली-