तपाप्रमाणे दानाचेही तीन प्रकार आहेत. दान केल्याचे उपकार न मानणारा, काळ व पात्र पाहून दान करणारा सात्त्विक दानी असताे. उपकाराचा माेबदला म्हणून, फळाची अपेक्षा धरून अतिशय कष्टाने जे दान दिले जाते त्याला राजस दान म्हणतात. अयाेग्य ठिकाणी, अयाेग्य काली, अपात्र मनुष्यास अवहेलनापूर्वक जे दान दिले जाते त्याला तामस दान म्हणतात. या तीन दानांपैकी ज्ञानेश्वर प्रथम सात्त्विक दानाचे वर्णन करतात.स्वधर्माचे आचरण करून जे आपणांस मिळते ते इतरांना माेठ्या सन्मानाने द्यावे. चांगले बीज येण्यासाठी चांगल्या वाफ्याची जशी उणीव पडते, त्याप्रमाणेच सात्त्विक दान देण्यावर मर्यादा पडतात.पण भाग्य उदयास आले की, सण, इष्ट, मित्र, ऐश्वर्य यांचा याेग आला की उत्कृष्ट दान देण्याचा प्रसंग पुढे येताे.
प्रथम कुरुक्षेत्र वा काशी हे स्थळ असावे. नाहीतर ताे देश असला तरी चालेल, काळही पवित्र असावा. दानाचे पात्र उत्कृष्ट असावे. सदाचरणाची मूळ जागा वेदांताचा माल उतरविण्यासाठी अतिशय पवित्र असावी. मग त्या ठिकाणी द्रव्य अर्पण करून आपली मालकी साेडून द्यावी.पतीपुढे जशी स्त्री प्रेमाने येते. त्या प्रेमाने दान द्यावे. निष्काम अंत:करणाने जमीन अर्पण करावी. आणि फळाची इच्छा धरू नये.दान दिल्यानंतर काेणतीही परत ेडीची आशा धरू नये. आकाशाला हाक मारली असता प्रतिध्वनी येत नाही. आरशाच्या मागून प्रतिबिंब दिसत नाही, त्याप्रमाणे प्रेमाचा माेबदला घेता येत नाही. दान घेणारा, दान देणारा यांनी कसलीही अपेक्षा करू नये.दात्याने तर त्याची आठवणही चित्तात राहू देऊ नये. असे हे दान सर्व दानांत श्रेष्ठ असून ते सात्त्विक असते.