चाणक्यनीती

22 May 2023 13:12:47
 
 

Chanakya 
 
वाच्यार्थ : मेघातील पाण्यासारखे पाणी नाही, आत्मबळासारखे दुसरे बळ नाही, नेत्रज्याेतीसारखे दुसरे तेज नाही आणि अन्नासारखे प्रिय दुसरे काहीही नाही.
 
भावार्थ : वरील श्लाेकात चाणक्यांनी सर्वाे त्कृष्ट गाेष्टींची चर्चा केली आहे.
 
1. मेघातील पाणी : वर्षा ऋतूत आकाशात कृष्णमेघांची दाटी झाली की, सारी सृष्टी आनंदमय हाेते. चकाेराचा शब्द, मयूराचे विलाेभनीय नृत्य पाहायला मिळते. पशू, पक्षी, प्राणी, मानव विशेषत: शेतकरी आनंदी हाेतात.
पृथ्वीवर जलसाठे खूप असतात.
Powered By Sangraha 9.0