फाेडिले भांडार धन्याचा हा माल ।मी तंव हमाल भारवाही ।।1।।

20 May 2023 12:20:45
 
 
 

saint 
खरे म्हणजे अनेक लाेक केवळ माेठेपणासाठीच जगतात, असे म्हटले तरी चुकीचे हाेणार नाही. आपल्याकडे जे आहे ते काेणाच्यातरी कृपेचा प्रसाद आहे किंवा काेणाच्यातरी मार्गदर्शनाने, सहकार्याने आपण घडलाे आहाेत, असे सांगण्यात अनेकांना कमीपणा वाटताे. स्वत:ला कमीपणा घेण्यात दु:ख मानणारे आणि पात्रता नसतांनाही माेठेपणा मिळवून त्यात आनंद मानणारे लाेक खऱ्या अर्थाने दु:खी असतात.पण सर्वच लाेक अशा प्रकारचे असतात असे नाही.ज्यांना स्वपरीचय झाला आहे, असे लाेक माेठेपणापासून दूर राहतात.
 
लाेक यांना माेठेपणा देऊ लागले तरी हे लाेक आपण माेठेपणास पात्र नसण्याचे सांगतात. जगद्गुरु असणारे तुकाेबाराय जनकल्याणासाठी साहित्याचे भांडार स्वानुभवातून खुले करतात.तरीपण हे ज्ञान भांडार आपले नसून हे आपल्या आईवडीलांच्या कृपेचे, सद्गुरुंच्या आशीर्वादाचे, पांडूरंगाच्या मालकीचे असल्याचे सांगून आपण या ज्ञान भांडाराचे ओझे वहाणारे हमाल असल्याचे म्हणतात. या अनुषंगाने बाेलतांना ते म्हणतात, फाेडिले भांडार धन्याचा हा माल । मी तव हमाल भारवाही ।। स्वपरिचयाचा प्रयत्न केला तर महाराजांच्या भावना खऱ्या अर्थाने अनुभवता येतील.
जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0