गीतेच्या गाभाऱ्यात

20 May 2023 12:12:11
 
 
पत्र सतरावे
 
Bhagvatgita
हॅम्लेटला खूप दु:ख झाले. हे दु:ख हाेणे साहजिकच आहे. पण त्यानंतर कर्तव्यकर्म त्याने केले नाही. ताे माेहात अडकला. अर्जुनाला जसा माेह झाला तसाच त्याला माेह झाला. अर्जुनाचा माेह नाहीसा करायला कृष्ण हाेता पण हॅम्लेटचा माेह नाहीसा करण्याकरता काेणीच नव्हता.आपल्या बापाचा वध करणाऱ्या चुलत्याला ठार मारू, का आपल्या आईचा नवरा म्हणून त्याची गय करू, हा पेचप्रसंग त्यास सुटला नाही. माेहामध्ये गुरफटलेल्या बिचाऱ्या हॅम्लेटचा दु:खी अंत झाला.अर्जुन जेव्हा युद्ध करत नाही म्हणाला व जेव्हा ताे माेहापाशात अडकला हाेता तेव्हा त्याचा माेह दूर करण्याकरता कृष्ण हाेता. कृष्णाने त्याचा माेह नाहीसा केला, त्याचा विषाद दूर केला व त्याला कर्तव्य करावयास लावले.काही लाेक म्हणतात- ‘‘देवाचा नाद हे थाेतांड आहे, आपणाला देवाचा अजिबात ओढा वाटत नाही.’’ अशा लाेकांबद्दल तुला फार राग येताे. ह्या लाेकांबद्दल तू अजिबात रागावू नकाे.
 
परमार्थात एक मार्मिक गाेष्ट आहे.एक तरुण हाेता. घरचा श्रीमंत हाेता. राहणेस वाडा हाेता.नाेकर-चाकर हाेते. पण त्याच्यामध्ये काही शारीरिक व्यंग असल्यामुळे त्याचे लग्न हाेत नव्हते. ताे लग्नाला हपापलेला हाेता. त्या सुखाशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे असे त्यास वाटत हाेते. ताे सदा कदा दु:खी-कष्टी असे.त्याचा एक लहान भाऊ हाेता. ताे दादाला म्हणे- ‘‘दादा! तू दु:खी का? तुला पेढा आणून देऊ का? बर्फी आणून देऊ का?’’ दादाला काय दु:ख आहे हे त्या लहान मुलाला काय समजणार?मनुष्य वयात आल्यावर त्याला त्या सुखाची कल्पना असत नाही. मनुष्य वयात आल्यावर त्याला त्या सुखाची ओढ लागते. ताेपर्यंत त्याबद्दल त्याला काही समजत नाही.ते सुख आणि ती ओढ समजण्याचे त्याचे वय झालेले नसते.मनुष्य वयात आला म्हणजे ताे सज्ञान झाला असे म्हणतात.खेडेगावांत पुरुष वयात आला अथवा स्त्री वयात आली म्हणजे त्याला ‘शहाणा’ झाला असे म्हणतात व तिला ‘शहाणी’ झाली असे म्हणतात.
 
मनुष्य ‘सज्ञान’ झाला अथवा ‘शहाणा’ झाला म्हणजे त्याला आपाेआप त्या सुखाची ओढ लागते.परमार्थात असेच आहे. मनुष्याला देवाची ओढ वाटू लागली अथवा देवाच्या सुखाकरता ताे हपापू लागला म्हणजे परमार्थांत ताे सज्ञान झाला असे समजावे.ज्यांना देवाची ओढ वाटत नाही, ज्यांना देवाच्या सुखाची कल्पना नसते असे लाेक परमार्थाच्या प्रांतात ‘‘अज्ञान’’ असतात. अशा लाेकांच्याबद्दल रागावून काय उपयाेग? ते अजून लहान आहेत, त्यांना अजून ती अवस्था येणेची आहे.लग्नासाठी हपापलेल्या दु:खी कष्टी माेठ्या भावाला ‘‘पेढा देऊ का? बर्फी देऊ का? असे म्हणणाऱ्या लहान भावाची जी अवस्था तीच अवस्था अशा लाेकांची असते.त्यांच्यावर राग धरण्याचे कारण नाही. हे लाेक परमार्थात ‘‘सज्ञान’’ हाेतील व मग त्यांना देवाचा ओढा वाटू लागेल.देवाच्या सुखासाठी ते हपापतील, म्हणतील त्या सुखाशिवाय जीवनाचे सार्थक नाही.हा विचार तुला समजला म्हणजे ज्यांना देवाचा ओढा वाटत नाही त्यांच्याबद्दल तुला राग येण्याचे कारण नाही.पुढचा तुझा प्रश्न फार मार्मिक आहे.गीतेने भ्नतीवर जाेर दिला आहे. यात वाद नाही.
Powered By Sangraha 9.0