3. प्रज्ञा : व्यक्तीला विशेष बुद्धी असेल तर ती व्यक्ती काेणत्याही प्रकारचे ज्ञान ग्रहण करून ते लगेच आत्मसात करते. अशा व्यक्तीच्या अज्ञानाचा साहजिकच नाश हाेताे आणि इतरांनाही तिच्याकडून ज्ञानाचा प्रकाश (शिकवण) मिळू शकताे.
4. भावना : भावना दाेन प्रकारच्या असतात.‘हीन भावना’ आणि ‘उच्चप्रतीच्या भावना.’ इतरांविषयी मनात दया, क्षमा, करुणा, प्रेम अशा भावना असल्यास व्यक्तीच्या मनातील भीतीची भावना नष्ट हाेते. इतरांचे वाईट केल्यास मनात कुठेतरी खाेल भीती दबा धरून बसते. याउलट इतरांचे भले केल्याने मन नि:शंक आणि शांत हाेते. सुरक्षिततेची भावना मनाेबल वाढविते. निस्सीम देशभक्त भगतसिंग मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत ाशी गेला.भक्त प्रल्हाद त्याच्या श्रीहरीवरच्या निस्सीम भक्तीच्या बळावर पित्याने, हिरण्यकश्यपूने याेजिलेल्या मृत्यूच्या महाभयंकर याेजनांना शांतिचित्ताने सामाेरा गेला.
बाेध : दान करण्याची तयारी चांगले चारित्र्य आणि विशिष्ट ज्ञान या गाेष्टींमुळे व्यक्तीची प्रगतीच हाेते. तसेच परमेश्वरावर श्रद्धा असेल तर कशाचेही भय उरत नाही, मृत्यूचेही नाही.