वस्तू वाचवण्याचा प्रयत्न आजही चालू आहे. पण त्याची वैज्ञानिक कारणं हरवून गेल्यामुळे असा प्रयत्न करणारा मूर्ख, अडाणी वाटताे. आणि जाे माेडून ताेडून टाकण्याच्या प्रयत्नात आहे, ताे बुद्धिमान वाटत आहे.बऱ्याच गाेष्टी ताेडून फेकण्यासारख्या आहेत हे जाे जाणताे त्याची अडचण हाेऊन जाते. कारण त्याच्यामागे वैज्ञानिक कारणं काही नाहीयेत, त्या वस्तू फ्नत काळाच्या प्रवाहात वाहून आल्या आहेत. आणि कित्येक गाेष्टी वाचवण्यासारख्या आहेत, कारण त्यांच्यामागे काही वैज्ञानिक कारणं आहेत, जरी ही कारणं काल-प्रवाहात विसरली गेली आहेत आणि आपण ती हरवून बसलाे आहाेत.ही बाह्य परिस्थिती निर्माण करावयाची आहे. एका मनःस्थितीला जन्म देण्यासाठी आणि निश्चितच बाह्य परिस्थितीत असे आधार शाेधणं श्नय आहे. कारण बाह्यपरिस्थितीत विराेध व अडथळेही असतात.
त्या विधीचे एक आणखी पुढचे पाऊल. शरीर बिलकुल एका सरळ रेषेत असावं. जमिनीशी नव्वद अंशाचा काेन करून अशा प्रकारे बसावे.पाठीचा कणा जर असा नव्वद अंशात असेल तर मस्तक आपाेआप एका सरळ रेषेत येईल.जेव्हा कणा असा नव्वद अंशाच्या काेनात असताे अन् अगदी सरळही असताे, तेव्हा आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून जवळजवळ बाहेर हाेऊन जाताे.अशा प्रकारे गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर हाेऊन जाणे हा ऊर्ध्वगमनाचा मार्ग बनून जाताे, ही एक गाेष्ट.दुसरी गाेष्ट - दृष्टी नाकाच्या टाेकावर असावी. जर दृष्टी अशी नासाग्रावर ठेवायची असेल तर पापण्या झुकतील.